Aditi Sarangdhar and Manasi Natekar dance Video: अभिनेत्री अदिती सारंगधर सध्या ‘सनई चौघडे’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत काम करत आहे. आता तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘सनई चौघडे’ या मालिकेत अदितीने तेजस्विनी खानोलकर ही भूमिका साकारली आहे. जय, साक्षी, गौतमची आई आणि एक यशस्वी उद्योजिका म्हणून तेजस्विनी खानोलकरची ओळख आहे. तिने एकटीने तिन्ही मुलांना वाढवले आहे, मोठा बिझनेस उभारला आहे.
अदिती सारंगधरचा सहअभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स
याच मालिकेत अभिनेत्री मानसी नटेकरनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. समायरा असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. मानसीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अदिती दिसत आहे. त्या दोघी ‘चोरीचा मामला’ या गाण्यावर सुंदर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अदिती व मानसी यांच्या डान्स स्टेप्स, त्यांची एनर्जी आणि हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. दोघींनीही सुंदर साड्या नेसल्या आहेत. त्यांच्या लूकचे कौतुक होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मानसीने अदितीबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या. तिने लिहिले, “अदिती ताई, तुझ्याबरोबर सीन करायला खूप मजा येते, तुझ्याकडून कायमच शिकायला मिळते. तू कमाल आहेस. मला तुझी एनर्जी खूप आवडते.”
मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओवर मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणारे कलाकार मेघना एरंडे, जुई गोगरी, चिन्मयी साळवी यांनी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच, चाहत्यांनीही कमेंट्स करत प्रेम व्यक्त केले आहे. एकाने लिहिले, “खानोलकर मॅडम, छान”, दुसऱ्या एकाने लिहिले, “दोघींनी खूप छान डान्स केला”, आणखी एकाने लिहिले, “सुंदर डान्स”, एकाने लिहिले, “मस्त डान्स”, एका नेटकऱ्याने लिहिले, “कमाल”, अशा कमेंट्स केल्या आहेत.



दरम्यान, ‘सनई चौघडे’ या मालिकेबद्दल बोलायचे तर गौतम व असावरी यांचा साखरपुडा होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यांचा साखरपुडा होणार की त्यात कोणता ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
