प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं सोमवारी(२२ मे) दुपारी निधन झालं आहे. मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. यामुळे सिनेविश्वात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आता आदित्य सिंह राजपूतने शेवटचा फोन कोणाला केला होता, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सिंह हा शौचालयात पाय घसरुन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यावेळी त्याला दोन जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्याचे आढळून आले होते. मार लागल्यामुळे डोक्याच्या डाव्या बाजूला सूज आली होती, मात्र रक्तस्त्राव झाला नसल्याचे निदर्शनास आले होते. आदित्य सिंहच्या घरातून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यावेळी तो सर्वात शेवटी आईशी बोलल्याचे समोर आले आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य
How names of two lions Sita and Akbar
सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित

आदित्यच्या मृत्यूनंतर आई उषा यांना धक्का बसला आहे. त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. आदित्य मृत्यूपूर्वी त्याच्या आईशी शेवटचे बोलला होता. याबद्दल बोलताना त्याची आई म्हणाली, “माझ्या मुलाने मला २१ मे रोजी दुपारी २.१५ वाजता कॉल केला होता. त्यावेळी आम्ही दोघेही व्हॉट्सअॅपबद्दल बोलत होतो. माझ्या व्हॉट्सअॅपचे काही जुने मेसेज डिलीट झाले होते.

त्यामुळे मी त्याला फोन केला होता आणि त्याला एक मेसेज करण्यास सांगितले होते. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी मला मेसेज केला होता. त्याने ‘मम्मा’ असे सांगत हार्ट इमोजी शेअर केला होता. त्याबरोबर त्याने एक व्हॉईस नोट पाठवत मला व्हॉट्सअॅपच्या तक्रारीबद्दलही सांगितले होते. त्यावेळी मी त्याचा आवाज शेवटचा ऐकला होता.”

“यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राचा फोन आला आणि त्याने मला घडलेला प्रकार सांगितला होता. ही बातमी ऐकून मी पूर्णपणे सुन्न झाले. मी सामान घेऊन मुंबईसाठी रवाना व्हावे, त्यासाठी तिकीट बुक करावे याच्याही हिंमत माझ्यात नव्हती”, असे आदित्यची आई उषा यांनी सांगितले.

दरम्यान आदित्य सिंग राजपूतची आई निवृत्त सरकारी अधिकारी आहे. त्या दिल्लीत एकट्याच राहतात. तर त्याचे वडिल दिल्ली उच्च न्यायालयात वकील होते. त्यांचे २०१२ मध्ये निधन झाले होते. त्याची बहिण अमेरिकेत राहते.