scorecardresearch

Premium

Bigg Boss 17: बिग बॉसच्या आगामी पर्वात अ‍डल्ट कंटेंट क्रिएटर आणि मिस इंडिया होणार सहभागी

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वातील ‘या ‘दोन स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या

adult content creator Shilpa Sethi and Actress Manasvi
'बिग बॉस'च्या १७व्या पर्वातील 'या 'दोन स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या

लोकप्रिय वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं १७वं पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही स्पर्धकांची नाव निश्चित झाली आहेत. अशातच बिग बॉसच्या या आगामी पर्वात अडल्ट कंटेंट क्रिएटर आणि मिस इंडिया सहभागी होणार असल्याच समोर आलं आहे.

हेही वाचा – “डिशमध्ये एवढी अनास्था…” मुक्ता बर्वेला पोह्यांचा आला वाईट अनुभव, संताप व्यक्त करत म्हणाली..

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
malabar gold titan and 4 other indian brands get place on global luxury goods list
मलाबार गोल्ड, टायटनसह चार नाममुद्रांना जागतिक मानांकन
Richest Females in the world
सर्वाधिक श्रीमंत महिला कोण? अब्जाधीश महिलांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक? जाणून घ्या!

यंदाच्या बिग बॉसची थीम खूप वेगळी आहे. सिंगल विरुद्ध कपल अशी ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची थीम आहे. अंकिता लोखंडे आणि विक्की जैन हे शोचे पहिले निश्चित स्पर्धक आहे. याशिवाय कंवर ढिल्लो आणि ऋषभ जयसवाल यांचं देखील नाव निश्चित झालं आहे. आता आगामी पर्वात जबरदस्त एन्ट्री घेण्यासाठी अडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठी सुद्धा तयार असल्याच समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सनी लिओनी आणि पामेला एंडरसन यांच्यानंतर ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीची एन्ट्री होणार आहे. ‘किम कार्दशियन ऑफ इंडिया’ म्हणून तिला ओळखलं जात. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या खूप चर्चेत असतात. शिल्पा व्यतिरिक्त अभिनेत्री आणि पूर्वाश्रमीची मिस इंडिया मनस्वी ममगई बिग बॉस शोमध्ये सहभागी होणार आहे.

हेही वाचा – Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन

दरम्यान, सिंगलच्या यादीत हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री इशा सिंह, इशा मालवीय, जय सोनी, समर्थ जुरेल, फहमान खान आणि लोकप्रिय युट्यूबर हर्ष बेनिवाल यांची नावं आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adult content creator shilpa sethi and actress manasvi mamgai will be a part of bigg boss 17 pps

First published on: 07-10-2023 at 19:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×