लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष | after marriage akshaya deodhar and hardeek joshi at nashik actress mangalsutra design see details | Loksatta

X

लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

लग्नानंतर हार्दिक जोशी व अक्षया देवधर नाशिकला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
लग्नानंतर हार्दिक जोशी व अक्षया देवधर नाशिकला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे नवं विवाहित जोडपं सध्या चर्चेत आहे. हार्दिक-अक्षयाने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अजूनही हार्दिक व अक्षयाचे हळदी, संगीत व लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…

लग्नानंतर हार्दिक व अक्षया कॉफी डेटसाठी गेले होते. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच कॉफी डेट होती. त्यानंतर हार्दिक अक्षयाला घेऊन रोड ट्रिपसाठी गेला. यादरम्यानचा व्हिडीओ अक्षयाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

आता हे नवविवाहित जोडपं नाशिकला पोहोचलं आहे. या दरम्यानचा फोटो अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. फोटो शेअर करत आम्ही नाशिकला असल्याचं तिने सांगितलं आहे. या फोटोमध्ये अक्षया व हार्दिक गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत.

आणखी वाचा – अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…

अक्षयाने लग्नानंतरही पारंपरिक लूक केला आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसलेली दिसत आहे. तर हार्दिकने सदरा परिधान केला आहे. विशेष म्हणजे अक्षयाच्या मंगळसुत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयाचं मंगळसुत्र अगदी साधं असलं तरी काळ्या मण्यांमध्ये ते तयार करण्यात आलं आहे. शिवाय अगदी नाजूक मंगळसूत्र न घालता तिने मोठं मंगळसूत्र घालणं पसंत केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:37 IST
Next Story
बॉडी शेमिंगवरुन बोलल्यानंतर अपूर्वा नेमळेकर भडकली, म्हणाली “राखी तुझ्यासारखी प्लास्टिक सर्जरी करुन…”