scorecardresearch

“…तेव्हा मी झॉम्बीसारखी वागायचे” तुनिषा शर्माने तिच्या डिप्रेशनबाबत केलेला खुलासा

‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तुनिषाने या गोष्टीबद्दल खुलासा केला

“…तेव्हा मी झॉम्बीसारखी वागायचे” तुनिषा शर्माने तिच्या डिप्रेशनबाबत केलेला खुलासा
फोटो : इंडियन एक्सप्रेस

अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खानला याला अटक केली आहे. त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे.

दरम्यान एफआयरआमध्ये प्रेमसंबंध तुटल्याने तुनिषा तणावात होती असा खुलासा झाला आहे. शिवाय तुनिषा ही गरोदर असल्याचीही चर्चा झाली होती. पोलिसांनी ही गोष्ट खोडून काढली असली तरी तिच्या तणावाबद्दल सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरसुद्धा तो डिप्रेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिझान खानच्या वकिलांचा मोठा खुलासा; म्हणाले “हे आरोप…”

तुनिषानेसुद्धा तिच्या डिप्रेशनबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. याची चर्चा आता पुन्हा होत आहे. ‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये तुनिषाने या गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. तुनिषा या मुलाखतीमध्ये म्हणाली, “इंटरनेटवाला लव्ह ही मालिका सुरू होण्याआधीपासून मला या डिप्रेशनचा त्रास होता. खूप लहानवयात वडीलांचे निधन झाल्याने जबाबदारी माझ्या खांद्यांवरच आली, त्यानंतर माझी बहीण आणि आजी यांचेही निधन झाले. यामुळेच माझी मानसिक स्थिति अस्थिर होती. मी यासंदर्भात डॉक्टरचा सल्लादेखील घेतला, तेव्हा माझ्या नैराश्याचं आणि डिप्रेशनचं निदान झालं.”

इतकंच नाही तर यावर तुनिषाने औषधोपचारसुद्धा घेतले. याविषयी बोलताना तुनिषा म्हणाली, “जेव्हा यावर मी औषध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा अक्षरशः ‘झोम्बी’सारखी वागायचे. मला मालिकेच्या चित्रीकरणासाठी सेटवरही जावंसं वाटायचं नाही. यादरम्यान मला माझी आई आणि मैत्रीण कनवर यांनी खूप पाठिंबा दिला.” पोलिसही तुनिषाच्या आत्महत्येच्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शिवाय गेल्या २४ तासात तुनिषा कोणाच्या संपर्कात होती, तिने कोणाशी फोनवर संपर्क साधला त्या सगळ्यांची चौकशी होत असून जबाब नोंदवले जात आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 19:50 IST

संबंधित बातम्या