बिग बॉस १६ चा विजेता रॅपर एमसी स्टॅन सध्या देशभरातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट घेत आहे. त्याच्या काही कॉन्सर्टमध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी पाहायला मिळाली. तर काही कॉन्सर्टसाठी त्याला कडाडून विरोध झाला. त्याची गाणी ऐकण्यायोग्य नसल्याचं म्हणत त्याला काही संघटनांकडून विरोधही झाला. अशातच गर्दीत त्याला मारायला लोक आल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. “मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…” एमसी स्टॅनवर पुन्हा एकदा गर्दीत हल्ला झाला आहे. एमसी स्टॅनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एमसी स्टॅन एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन त्याच्या सुरक्षा रक्षकांसह गर्दीतून जात आहे. यादरम्यान अनेक चाहते एमसी स्टॅनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच त्याच्यावर हल्ला होतो. यादरम्यान स्टॅन कोणावर तरी ओरडताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून रॅपरचे चाहते खूपच हैराण झाले आहेत. एमसी स्टॅनवर पुन्हा एकदा झालेला हल्ला पाहून त्याचे चाहते संतापले आहेत. त्याच्या चाहत्यांचा राग आता सोशल मीडियावर उमटत आहे. या व्हिडीओवर युजर्स कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहेत. पण व्हिडीओत स्टॅन शिव्या देतोय आणि रागावलेला दिसतोय, यावरून नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत. हा २४ तास फक्त शिव्याच देत असतो, असं ते म्हणत आहेत.