‘पारू’ या मालिकेत दररोज नवीन काहीतरी घडताना दिसते. कधी पारूला फसवले जाते, कधी तिच्याबरोबर चांगले बोलले जाते, कधी आदित्यवर संकट येते, दामिनी प्रियाला पारूविरूद्ध भडकावण्याचा प्रयत्न करते, अनेकदा पारू आणि आदित्यची मैत्री फुलताना दिसते. आता मात्र किर्लोस्कर कुटुंबावर संकट आल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.

बंदूक घेऊन किर्लोस्करांच्या घरात एका व्यक्तीने केला प्रवेश

झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, किर्लोस्करांच्या घरात काम करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. एक वक्ती दुसऱ्याला काहीतरी सांगते आणि ती निघून जाते. त्यानंतर आदित्य त्याच्या कारमध्ये बसून कामासाठी जातो. आदित्यची गाडी गेल्यानंतर ती व्यक्ती खिशातून बंदूक काढते आणि हसते. या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारू अहिल्यादेवी किर्लोस्करला विचारते की, देवी आई मी तुम्हाला काही सांगितलं तर कराल का तुम्ही? त्यावर अहिल्या काय? असं विचारते. त्याचवेळी बंदूक घेतलेली व्यक्ती घरात येऊन एका रूममध्ये जाताना दिसत आहे. पारू जे काही अहिल्याला सांगते, ते ऐकल्यानंतर अहिल्यादेवीच्या चेहऱ्यावर काळजी दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अहिल्या पारूचं ऐकेल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे पारू ही किर्लोस्करांच्या घरात नोकर म्हणून काम करते. अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवीप्रमाणे मानते आणि ती म्हणेल ती प्रत्येक गोष्ट ऐकते. एका जाहिरातीत काम करताना अहिल्यादेवीचा मुलगा आदित्य पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्याला पारू हे सर्व खरेच आहे असे समजते. तेव्हापासून पारू आदित्यला नवरा मानते आणि किर्लोस्करांच्या घरातील सर्व कामे मोठ्या सूनेची जबाबदारी म्हणून करते. आदित्यची काकू पारूवर सतत संशय घेत असते आणि तिला त्रास देण्याकरिता विविध गोष्टी करत असते. पारू मात्र किर्लोस्करांच्या घरातील सर्वांना आनंदित ठेवण्यासाठी, काळजी घेण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी परिश्रम घेताना दिसते.

हेही वाचा: अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल

आता घरावर आलेले हे संकट अहिल्यादेवी आणि पारू कसे दूर करणार, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader