Aishwarya & Avinash Narkar Dance Video : मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. या दोघांचे रील्स आणि डान्स व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. सध्या नारकर जोडप्याने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी सर्वत्र ट्रेंडिंग असलेल्या एका तेलुगू गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम रील्सवर “Gira Gira Gingiraagirey” हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चॅम्पियन’ चित्रपटातील हे गाणं आहे. या तेलुगू गाण्याने गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला आहे. मूळ गाण्याप्रमाणे हुबेहूब हूकस्टेप्स करत “गिरा गिरा…”वर नेटकरी रील्स व्हिडीओ शूट करत आहेत.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी सुद्धा नुकताच या व्हायरल गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. नारकर जोडप्याचे एक्स्प्रेशन्स, त्यांच्या एनर्जीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. “गिरा गिरा…” गाण्यावर डान्स करताना ऐश्वर्या नारकरांनी सुद्धा सुंदर लूक केला होता. अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, तर अविनाश नारकरांनी प्रिंटेड कुर्ता घातलाय. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Award Banner

“तुम्ही दोघं किती छान दिसता”, “लय भारी ऐश्वर्या मॅडम आणि अविनाश दादा”, “जबरदस्त परफॉर्मन्स”, “ऐश्वर्या ताई छानच डान्स करतात पण सरांची एनर्जी खूपच कमाल असते… मस्तच”, “मला या दोघांचे व्हिडीओ खूप आवडतात”, “आपली सुपर जोडी…काय सुंदर बॉण्डिंग आहे” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर हे दोघंही सध्या ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिकांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकत आहेत.