Aishwarya And Avinash Narkar Dance Video : लोकगीतं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला लोकगीतं व नाट्यसंगीताचा समृद्ध इतिहास व अमूल्य वारसा लाभला आहे. आजही प्रत्येक समारंभात ही लोकगीतं आवर्जून गायली जातात. नुकताच मराठी मनोरंजन विश्वातील ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या एव्हरग्रीन जोडीने एका प्रसिद्ध लोकगीतावर डान्स केला आहे. गेल्या काही दिवसांपासून “ही फियाट गाडी माझी म्हणू का?” हे लोकगीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“ही फियाट गाडी माझी म्हणू का?” हे लोकगीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे. सध्या इन्स्टाग्राम रील्सवर या लोकगीताने धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनी सुद्धा या गाण्यावर रील्स व्हिडीओ बनवले आहेत.
ऐश्वर्या व अविनाश नारकरांचे डान्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. नुकताच या दोघांनी “ही फियाट गाडी माझी म्हणू का?” या लोकगीतावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. ऐश्वर्या यांनी या व्हिडीओमध्ये लाल रंगाची सुंदर साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अवघ्या दोन तासांत ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.
अविनाश व ऐश्वर्या नारकरांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हेमांगी कवी म्हणते, “ये बात…अवि दादा, काय त्या Moves! Oh Oh Oh…ऐश्वर्या ताई पण लय भारी” याशिवाय अन्य युजर्स म्हणतात, “बेस्ट डान्स”, “अविनाश सरांची एनर्जी लेव्हल”, “फायर डान्स”, “तुम्ही दोघेही छान कलाकार आहात… छान फिटनेस”, “मस्त आणि दोघेही फिट आहेत”, “सरांची एनर्जी लेव्हल कमाल आहे”, “खूप छान दोघेही एक नंबर”, “अविनाश सर आणि ऐश्वर्या मॅम… तुमच्या रील्स मी बरेच दिवसांपासून पाहते आणि खरंच…तुमच्या रील्स अप्रतिम असतात!”, “माणसाने यांच्यासारखं जगावं खरंच कमाल”, “फारच सुंदर डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अविनाश नारकर ‘तारिणी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहेत. याशिवाय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर स्टार प्रवाहच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
