Aishwarya And Avinash Narkar Dance Video : लोकगीतं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला लोकगीतं व नाट्यसंगीताचा समृद्ध इतिहास व अमूल्य वारसा लाभला आहे. आजही प्रत्येक समारंभात ही लोकगीतं आवर्जून गायली जातात. नुकताच मराठी मनोरंजन विश्वातील ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या एव्हरग्रीन जोडीने एका प्रसिद्ध लोकगीतावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये या जोडप्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध ट्रेडिंग व लोकप्रिय गाण्यांवर नारकर जोडपं जबरदस्त डान्स करताना दिसतं. नुकताच या दोघांनी मराठी लोकगीतावर डान्स केला आहे.

Aishwarya Narkar and Avinash Narkar dance on Hauli Hauli Punjabi Song
Video: “हौली हौली…”, पंजाबी गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, “अनिल कपूरसुद्धा…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
aishwarya narkar titeeksha tawde dances on kolhapuri halgi
Video : कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “तोड नाही…”
Aishwarya Narkar dance on A.R. Rahman song water packet watch video
Video : ऐश्वर्या नारकरांचा ए. आर. रेहमान यांच्या तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
aishwarya narkar dances on darshan raval viral trending song
Video : व्हायरल हिंदी गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा साडी नेसून जबरदस्त डान्स! म्हणाल्या, “हूकस्टेपपेक्षा तुम्ही…”
Aishwarya Narkar gave wishes on Gokulashtami with a beautiful dance performance
Video: “कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी…”, ऐश्वर्या नारकरांनी सुंदर नृत्य सादरीकरणातून दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”
Grandfather and granddaughter dancing
आनंदाला वयाची मर्यादा नसते! चंद्रा गाण्यावर थिरकले आजोबा आणि नात, धमाल नृत्याचा Viral Video एकदा बघाच

हेही वाचा : तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी गुपचूप बांधली लग्नगाठ, प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली…

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा डान्स ( Aishwarya And Avinash Narkar )

ऐश्वर्या यांनी साडी नेसून तर, अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा घालून एका प्रसिद्ध लोकगीतावर डान्स केला आहे. ‘तुळजाभवानी आई’ असं कॅप्शन देत “गणबाई मोगरा गणाची साडी…” या लोकप्रिय मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याने जबरदस्त डान्स केला आहे. ऐश्वर्या व अविनाश यांच्या या डान्स व्हिडीओला अवघ्या २४ तासांत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : Phir Aayi Hasseen Dillruba : “जो पागलपन की हदसे ना गुजरे..”, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “एव्हरग्रीन जोडी”, “तुम्ही एक कलाकार म्हणूनच मोठे नाहीतर एक माणूस म्हणून पण खूप महान आहात”, “भारीच झालंय हे”, “खूप छान”, खूप “छान वाटतं तुम्हा दोघांना बघून”, “आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहुदे” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : Kangana Ranaut First Loksabha Speech: अभिनेत्री कंगना रणौतचं लोकसभेत पहिलं भाषण; कोणते मुद्दे मांडले? पाहा Video!

avinash narkar
ऐश्वर्या व अविनाश नारकर ( Aishwarya And Avinash Narkar Dance )

दरम्यान, या जोडप्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डंका’ चित्रपटात झळकले होते. प्रेक्षक या एव्हरग्रीन ऑफस्क्रीन जोडीला ( Aishwarya And Avinash Narkar ) पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.