Aishwarya & Avinash Narkar Dance Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांनीही आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. पण, अभिनयाच्या जोडीला ऐश्वर्या व अविनाश नारकर सोशल मीडियावर रील्स व्हिडीओ सुद्धा बनवतात. या दोघांचे डान्स व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होतात. हे दोघं कधी मराठी ट्रेंडिंग गाण्यांवर तर कधी पंजाबी, तामिळ गाण्यावर सुद्धा ठेका धरतात.

सध्या सोशल मीडियावर ‘Mutta Kalakki’ हे ‘युथ’ सिनेमातील तामिळ गाणं सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर सुद्धा ट्रेंडिंग आहे. या गाण्यात एक तालबद्ध लय (rhythm) वापरण्यात आलीये, यावरच सध्या नेटकरी Reels व्हिडीओ बनवत आहेत.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी सुद्धा हुबेहूब हुकस्टेप्स आणि भन्नाट एक्स्प्रेशन्स देत या तामिळ गाण्यावर सुंदर डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाची सुंदर साडी अन् त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज, साधा-सुंदर मेकअप, गळ्यात छानसं मंगळसूत्र या लूकमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहेत. तर, अविनाश यांनी प्रिंटेंड शर्ट घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “Very Nice डान्स”, “तुम्ही दोघंही कमाल आहात”, “अरे किती गोड नाचलात…मस्तच”, “खरंच जीवनाचा आनंद कसा घ्यावा… हे तुमच्याकडूनच शिकावं”, “किती सुंदर डान्स केलाय”, “याला म्हणतात आदर्श जोडी”, “दोघंही बिनधास्त आहेत…मस्त डान्स”, “लय भारी डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अविनाश नारकर सध्या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत ते काव्या-नंदिनीच्या सासऱ्यांची भूमिका साकारत आहेत. तर, ‘झी मराठी’च्या ‘तारिणी’ मालिकेत ते दयानंद खांडेकर ही ‘तारिणी’च्या सासऱ्यांची व केदारच्या बाबांची भूमिका साकारत आहेत. याशिवाय ते रंगभूमीवरही सक्रिय आहेत.

याशिवाय ऐश्वर्या यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर जवळपास एक वर्ष त्या मालिकाविश्वापासून दूर होत्या. आता लवकरच त्या स्टार प्रवाहच्या ‘आपल्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे वाहिनीने अद्याप जाहीर केलेलं नाहीये. मात्र, ऐश्वर्या यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत.