Aishwarya Avinash Narkar Dance Video : मराठी मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनयाच्या जोडीला हे दोघंही ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ सुद्धा बनवतात. या दोघांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी नुकताच एका ट्रेंडिंग मराठी लोकगीतावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने खास कॅप्शन दिलं आहे.
‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’, हे प्रसिद्ध मराठी लोकगीत आनंद शिंदे यांनी गायलं असून, सध्या इन्स्टाग्रामवर हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. याच लोकगीतावर ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘On Public Demand’ असं कॅप्शन दिलं आहे.
ऐश्वर्या नारकरांनी या गाण्यावर थिरकताना सुंदर अशी मजंठा रंगाची साडी अन् अविनाश नारकरांनी ग्रे रंगाच्या शेडचा कुर्ता घातल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ऐश्वर्या म्हणतात, “आमच्या डान्स स्टेप्स परफेक्ट नाहीयेत पण, आमची जोडी एकदम परफेक्ट आहे.”
नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खूप भारी मस्त डान्स”, “तुम्हा दोघांचा डान्स पाहून कायम भारी वाटतं”, “खूप छान…दोघंही असंच एन्जॉय करा”, “लय भारी डान्स”, “सरांची एनर्जी कमालच आहे”, “सर्वात आवडती जोडी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी यावर दिल्या आहेत. याशिवाय अश्विनी कासार, नंदिता पाटकर, तितीक्षा तावडे या अभिनेत्रींनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्स करत या जोडप्याचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओला अवघ्या तासाभरात दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या नारकर सध्या स्टार प्रवाहच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकत आहेत.
