Aishwarya Narkar Avinash Narkar Dance Reel : मराठी कलाविश्वातील लाडकी आणि सदाबहार जोडी ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून हे जोडपे नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असते. नुकताच त्यांनी ‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताताथैया’ या ट्रेंडिंग गाण्यावर एक जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. अविनाश नारकरांची अफलातून एनर्जी आणि ऐश्वर्या नारकर यांचे कातील एक्सप्रेशन्स पाहून चाहत्यांसोबतच इतर सेलिब्रिटीही या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.
अविनाश नारकर यांची अफलातून एनर्जी आणि ऐश्वर्या नारकर यांचे एक्सप्रेशन्स याचा सुंदर मिलाफ त्यांच्या डान्स व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. वयाच्या या टप्प्यावरही दोघांमधील असलेली अप्रतिम केमिस्ट्री, फिटनेस आणि कमालीचा उत्साह पाहून नेटकरी आणि इतर सेलिब्रिटी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. काही वेळेस नकारात्मक कमेंट्स किंवा ट्रोलिंगचा सामना करावा लागला, तरीही हे जोडपे त्याकडे दुर्लक्ष करत किंवा सडेतोड उत्तर देत बिनधास्तपणे आपल्या डान्सचा आनंद घेत चाहत्यांचे मनोरंजन करत राहतात.
‘जनाबाई आलीये ट्रेंडिंगला, किसना वाजवतो ताताथैया, ओह चाचा…वास्तेगुना हुईयां!’ असे बोल असलेल्या गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी जबरदस्त डान्स केला. व्हिडीओवर ‘होईना होईना’ असंही लिहिलंय.
पाहा ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा व्हिडीओ
अविनाश नारकरांची अफलातून एनर्जी व ऐश्वर्या नारकरांच्या डान्सवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एकदम परफेक्ट, गाणं भारीच, तुमची एनर्जी जबरदस्त आहे, तुम्ही दोघं आजही ज्या उत्साहाने, प्रेमाने आणि आनंदाने लोकांचं मनोरंजन करता, ते खरंच कौतुकास्पद आहे! तुमचं वय नाही, तर तुमचा उत्साह आणि सकारात्मकता महत्त्वाची आहे, वय वाढतंय पण मनाचं तारुण्य कसं टिकवून ठेवायचं, हे या जोडीकडून शिकावं, आनंदी जोडपं, अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन आणि लाडकी जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. हे दोघेही नाटके व मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून ते सतत नवनवीन ट्रेंडिंग आणि लोकप्रिय गाण्यांवर डान्स करताना दिसतात. ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ किंवा महाकवी वामनदादा कर्डक यांचे ‘ही फियाट गाडी माझी म्हणू का’ अशा गाण्यांवरील त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
