ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच त्यांच्या डाएटबद्दल, दिनचर्येबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सेटवर येताना त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर त्यांच्यासाठी डब्बा भरतात असं म्हटलं आहे. ऐश्वर्या यांनी दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण किती वाजता करतात याबद्दल सांगितलं आहे.

‘असा’ आहे ऐश्वर्या यांचा डाएट प्लॅन

ऐश्वर्या यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये त्या म्हणाल्या, “मी डब्बा घेऊन येते. भाज्या असतात, भाकरीचा डब्बा वेगळा असतो. वरण भाताचा डब्बा एक असतो. दुपारचं जेवण मी साधारण साडे अकरा बारापर्यंत करते. त्यामुळे तो एक डब्बा असतो. त्यानंतर सप्लीमेंट्स आहेत. ओमेगा ३, सी व्हायटीमीन, डी व्हायटीमीन असं सगळंच आहे जे मी दररोज घेते म्हणून बॅगेत ठेवते जेणेकरुन मी विसरणार.”

ऐश्वर्या यांना पुढे त्या रात्रीचं जेवणही घेऊन येतात का असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “जेवण म्हणजे लंच आणि डिनर. डिनर माझा सात-साडे सातला होतो. कारण ते सोयीस्कर आहे. तेव्हा नाश्त्याचा ब्रेकही होतो त्यामुळे मला ब्रेकमध्ये खाता येतं. मी दोन्हीवेळेचा डब्बा एकत्र आणते. एकत्र दोन वेगळे डब्बे असतात किंवा एकच भाजी जास्त प्रमाणात आणते आणि ती दोन वेळेला खाते. त्यानंतर मीड टाईम स्नॅकसाठी एक डाएट चिवडा दिलेला आहे. माझा मिड टाईम स्न्रकचा डब्बा अवी भरतो. त्यामुळे मला सांगावं लागतं की आता डाएटमध्ये हे नाहीये हे देऊ नको. आता त्याने खजूर आणि काळ्या मनुका देऊन ठेवल्या आहेत. त्यानंतर आता मी प्रोटीन लस्सी मागवतीये. जे मी जेव्हा इतर लोक जेवत असतात म्हणजे दीड-पावने दोनला तेव्हा मी लस्सी पिते किंवा ताक. माझ्याकडे फळं असतात. जी मी इथे आल्यानंतर मागवते. त्यानंतर माझ्याकडे एक कंटेनर आहे. जर शिफ्ट वाढली तर मी संध्याकाळी भुक लागलीये असं वाटलं तर पाण्यात टाकून घेते किंवा घरी जाऊन घेते.” ऐश्वर्या नारकर यांनी पुढे त्या त्यांच्या न्यूट्रिशनिस्टच्या सलल्यानुसार सर्व मल्टी व्हायटीमीन आणि सप्लीमेंट घेतात असं सांगितलं.

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून ते गहू खात नाहीये. त्या म्हणाल्या, “मी अनेक वर्षांपासून गहू खात नाहीये. २०१६पासून मी गहू खातच नाही. एक तर मला पोळीची फार आवडच नव्हती त्यामुळे मला ते सोपं गेलं. मी भात खाऊ आहे. मला सांगितलं गेलं की भाकरी जास्त चांगली आहे. त्यामुळे मी ते खाते. मी फार फुडी नाहीये. त्यामुळे मला जे सांगितलं जातं ते मी खाते.”

पुढे त्यांनी एक रेसिपीसुद्धा सांगितली आहे. त्या म्हणाल्या, “मिड टाईम स्नॅकला मी योगर्ट आणि फळं खाते. आता यावर बरीच मत मतांतरे आहेत की ते खावं की खाऊ नये पण मला डाएटीशनने सांगितलं आहे त्यामुळे मी खाते. मी ग्रीक योगर्ट घेते त्यात मी डाळिंबाचे दाने, पपईच्या फोडी घालून खाते. त्यामुळे त्याचा त्रासही होत नाही. मला तर नाही झाला. मिड टाईम स्नॅकसाठी हे खूप उत्तम आहे.”