संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना अनोख्या अंदाजात गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी देखील सुंदर नृत्य सादरीकरणातून गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याचे फोटो, व्हिडीओ हे सतत व्हायरल होत असतात. याशिवाय त्या आजूबाजूच्या घडामोडींवर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. तसंच चाहत्यांना मोलाचा सल्ला ही देत असतात. आज ऐश्वर्या नारकरांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. पूजेचा प्रसाद करतानाचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. सत्यनारायणच्या पूजेनिमित्ताने ऐश्वर्या नारकरांनी पारंपरिक लूक केला होता. गुलाबी किनार असलेली पिवळ्या रंगाची साडी त्यांनी नेसली होती. याच साडीमध्ये त्यांनी सुंदर नृत्य सादरीकरण केलं आहे.

aishwarya and avinash narkar dance on marathi old song
Video : “हिशोब सांगते ऐका…”, ५९ वर्षांपूर्वीच्या मराठी गीतावर नारकर जोडप्याने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, “ढोलकीचा ताल…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Bigg Boss Marathi Season 5 Suraj chavan Taunt to Abhijeet Sawant
Video: “तो आता गजनी झालाय”, निक्की आणि अभिजीतचा खेळ पाहून सूरजचा टोमणा, नेमकं काय घडलं? पाहा
Marathi Actress Aishwarya Narkar gave an answer to those trolling on age
Video: “तुमचं वय झालं” म्हणणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी अनोख्या अंदाजात दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Season 5 Fame Nikki Tamboli item song with Nawazuddin Siddiqui
Video: निक्की तांबोळीचं नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबरचं ‘हे’ आयटम साँग पाहिलंत का? केला होता जबरदस्त डान्स
bigg boss marathi nikki betrayed arbaz
Video : निक्कीने अरबाजला पुन्हा दिला धोका! टास्कमध्ये वेळवर मारली पलटी अन्…; अभिजीत ठरला कारण, नेमकं काय घडलं?
baba siddique shot dead after that shilpa shetty sanjay dutt rushed to hospital
Video : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवूडवर शोककळा! शिल्पा शेट्टी भावुक; संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले
The monkey sat on the woman's body watching these video
“अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…” माकडाने महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला : लीला फोडणार दहीहंडी, पाहायला मिळणार अभिरामबरोबरचा रोमँटिक क्षण

“गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा…”, असं कॅप्शन लिहित ऐश्वर्या नारकरांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘नटरंग’ चित्रपटातील ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ गाण्यावर नृत्य केलं आहे. ऐश्वर्या नारकरांच्या या नृत्याने आणि त्यांच्या सुंदर हावभावाने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: ‘गोविंदा आला रे’ कार्यक्रमात एजे आणि लीलाचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “एकदम झकास…”

हेही वाचा – घटस्फोटाने नाही तर ‘असा’ झाला ‘अंतरपाट’ मालिकेचा शेवट, टीआरपीअभावी ७६ भागांतच संपवली मालिका

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट झाल्याचं म्हटलं जात होतं. पण या मालिकेत काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या यांची नव्या भूमिकेतून जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. डॉ. मैथिली सेनगुप्ता या भूमिकेत त्या झळकल्या आहेत. या मैथिली सेनागुप्तामध्येच शतग्रीव नावाच्या असूराने प्रवेश केल्याच दाखवलं आहे. विरोचकाच्या वधाचा बदला घेण्यासाठी शतग्रीव कोलकातातून महाराष्ट्रात आला आहे. तसंच त्याने नेत्राच्या घरात प्रवेश देखील केला आहे. त्यामुळे आता नेत्राला विरोचकानंतर शतग्रीवचा सामना करावा लागणार आहे.