Aishwarya Narkar Son Ameya Narkar Birthday : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव आहे अमेय नारकर. सध्या तो परदेशात त्याचं उच्च शिक्षण पूर्ण करतोय. आज अमेयच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यासह त्याच्या गर्लफ्रेंडने सुद्धा खास पोस्ट शेअर केली आहे.
अमेय नारकर गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री ईशा संजयला डेट करत आहे. ईशा सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी या दोघांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सुद्धा सर्वत्र व्हायरल झाला होता. मायदेशी आलेल्या अमेयचं स्वागत करण्यासाठी ईशा पुष्पगुच्छ घेऊन एअरपोर्टला गेली होती. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशाने अमेयबरोबरचा Cute, रोमँटिक फोटो शेअर करत याला “Happy birthday, You” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच यापुढे तिने लव्ह इमोजी आणि evil eye इमोजी दिला आहे.
ईशाच्या या पोस्टवर अमेयने “Papuuuudaaaa!” अशी कमेंट करत रिप्लाय दिला आहे. याशिवाय कमेंट्समध्ये अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा अमेयवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेमुळे ईशा घराघरांत लोकप्रिय झाली आहे. यामध्ये तिने सूर्या दादाच्या बहिणीची म्हणजेच राजश्री ( राजू ) ही भूमिका साकारली होती.
तसेच, अमेय नारकरबद्दल काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाल्या होत्या, “माझा मुलगा या फिल्डमध्येच काम करणार आहे. पण, त्याने या फिल्डमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझं इतकंच म्हणणं होतं की, तू या क्षेत्रातलं व्यवस्थित शिक्षण घेऊन मग काम सुरू कर…रुईयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिका केल्या आहेत. मग हळुहळू त्याला या कामाची मजा येऊ लागली. पुढे, त्याने ललितला MA पूर्ण केलं. आता तो बाहेरगावी पुढील शिक्षणासाठी गेला आहे.”
