Aishwarya Narkar Titeeksha Tawde Aaradhi Aalay Nava dance : मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडे या सोशल मीडियावर रील शेअर करत असतात. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची चाहूल लागली असून इन्स्टाग्रामवर देवीची गाणी ट्रेंडिंगमध्ये आहेत. नेहमीच आपल्या रील्सने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्या व तितीक्षा यांनी ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र त्याची लगबग दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांनी इन्स्टाग्रामवर जबरदस्त डान्सची रील शेअर केली आहे. यामध्ये दोघींनी सुंदर अशा पारंपरिक खणाची काठ असलेल्या साडी नेसल्या आहेत. तितीक्षाने काळी तर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाची साडी स्टाइल केली आहे. त्यांनी सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या ‘आराधी आलाय नवा’ या गाण्यावर रील शेअर केली आहे.
ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी ‘आराधी आलाय नवा ग नवा’ गाण्यावर धरला ठेका
ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या ‘आराधी आलाय नवा ग नवा’ या गाण्यावर ठेका धरला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची झलक असलेल्या या गाण्यावर दोघींनीही सुंदर डान्स स्टेप्स केल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पारंपरिक लूक यामुळे खास नवरात्रीचा माहोल तयार झाला आहे. ‘नवरात्री वाइब्स’ असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यांच्या या रीलवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले, ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘प्रत्येक ट्रेंड न चुकता फॉलो करणे हे ऐश्वर्याताईला बरोबर जमते.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ‘याला म्हणतात मराठी कलाकार एक नंबर.’ तर एका नेटकऱ्याने लिहिले, ‘तुमचे व्हिडीओ मला फार आवडतात. एवढे सुंदर व्हिडीओ तुम्ही बनवता की बघून मनाला समाधान मिळतं.’
