Marathi Actress Dance Video : मराठी कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या ऑफस्क्रीन सुद्धा एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत. ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर या तिघींची मैत्री ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. मालिका संपल्यावरही या तिघींनी हे नातं कायम जपलं आहे. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची यांनी एकत्र मिळून साड्यांचा ब्रँड सुद्धा सुरू केला आहे.

सध्या ऐश्वर्या, सुरुची आणि तितीक्षा यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तिघींनी मिळून एका ट्रेंडिंग मराठी गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे हा डान्स करताना या तिघींनीही त्यांच्याच ब्रँडच्या साड्या नेसल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सुंदरा’ हे गाणं व्हायरल होत आहे. विशेषत: या गाण्यातील “गणबाई मोगरा गणाची साडी…” हे कोरस असलेलं कडवं सर्वत्र व्हायरल होत आहे. शमिका भिडे, अमिता घुगरी आणि अभिषेक काटे यांनी हे गाणं गायलं आहे, आणि आता याच गाण्यावर या तिन्ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री थिरकल्या आहेत.

Award Banner

ऐश्वर्या नारकरांच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अविनाश नारकरांनी या व्हिडीओवर, “ओह…क्या बात है” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य पियुष रानडे, अपूर्वा गोरे या कलाकारांनी सुद्धा या तिन्ही अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे.

तर, अन्य नेटकऱ्यांनी “किती गोड…”, “क्या बात है! शब्द अपुरे पडतील लय भारी”, “मस्तच नवीन ट्रेंड”, “खूपच छान ऐश्वर्या ताई…तुम्ही कायम अशाच राहा आम्हाला आवडता”, “ऐश्वर्या सगळ्यात सुंदर”, “वॉव ३ सुंदर अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर, सुरुची आणि तितीक्षा यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ हा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. मालिकेत एकत्र काम केल्यावर आता खऱ्या आयुष्यात सुद्धा मैत्री जपून एकत्र नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या या अभिनेत्रींवर कायमच सगळे कौतुकाचा वर्षाव करत असतात.