अभिनेत्री ऐश्वर्या शेटेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला करावा लागलेला संघर्ष, मिळालेली वाईट वागणूक याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने ती श्रीमंत घरातून असल्याने सेटवर काही जण तिला गृहीत धरायचे आणि वडिलांच्या पैशांवर जगते असं म्हणून हिणवायचे. मात्र तिने यासगळ्यातून हळूहळू वाट काढत मेहनतीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

ऐश्वर्या शेटेने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिच्या घरामध्ये सगळ्यांना मुलं आहेत मात्र फक्त तिच्या आई-वडिलांनाच दोन मुली आहेत पण याचा तिच्या वडिलांना अभिमान आहे कारण तिने व तिच्या बहिणीने त्यांच्या वडिलांचं नाव मोठं केलं याचा त्यांना आनंद आहे त्यामुळे ते त्या दोघींचे खूप लाडही करतात असं सांगितलं. यावेळी तिने तिला श्रीमंतीचा माज नाहीये पण तिचे वडील कायम त्यांना आनंदी ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात असंही म्हटलं. ऐश्वर्याने यावेळी तिची आईसुद्धा सगळं तिला हातात आणून देते त्यामुळे इतर लोकांना जो संघर्ष करावा लागतो तो तिला करावा लागत नसला तरी ती सुरुवातीला सेटवर जायची तेव्हा तिला वाईट वागणूक मिळाली असही तिने सांगितलं.

वडिलांच्या श्रीमंतीमुळे ऐश्वर्याला ऐकावे लागायचे टोमणे

मुलाखतीत ऐश्वर्या शेटे म्हणाली, “मी जेव्हा छोटे छोटे रोल करत होते तेव्हा जी वागणूक मिळायची ना तेव्हा माझं असं व्हायचं की हे काय आहे मला कोणी असं वागवत नाही असं नाही वागायचं माझ्याशी. पण नंतर हळूहळू अनुभव येत गेले आणि मी शिकले. मला या गोष्टीवरुन ऐकवलं जायचं की अजूनही बापाच्या पैशांवर जगतेय. किंवा एकटी स्वत:चं काही करत नाहीये. त्या गोष्टी मला खूप लागायच्या की आपण २० वर्षांचे झोलो, २२ वर्षांचो झाले अजून पप्पांबरोबर राहतो कारण बाकीचे सगळं सोडून आले होते. पण यात आता माझीही चूक नाहीये. कारण मला गावही नाहीये आणि माझे आई-वडील लांबही राहत नाही. त्यामुळे बाबा गाडी आणि ड्रायव्हरला बरोबर घेऊन जायला सांगायचे.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “मी बीएमडबल्यू किंवा मर्सिडीजने जायचे मग मी ते बंद केलं. मी म्हटलं मी रिक्षाने जाणार ते मला विचारायचे की का काय झालं तेव्हा मी नाही माझी मी जाईन असं सांगायचे. नंतर मी सेटकडे जाण्याचा रस्ता लहान आहे. गल्ली आहे वगैरे अशी कारणं द्यायचे. मी क्रेटा घेऊन जायचे आणि ती गाडी नेली तरी पण लोक बोलायचे की हिचं काय हिचा रंगाडा ती आपली घेऊन येते आम्हाला काय बसने जावं लागतं. ट्रेनने जावं लागतं त्यामुळे हा एक संघर्ष होता माझा की कंफर्टझोनच्या बाहेर जाऊन गोष्टी करणं. पण बाकी कामाच्या बाबतीत मला सतत एकापाठोपाठ कामं मिळत गेली. त्यामुळे कामासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण लोकांनी हिणवलं, त्रास दिला की तू काय तुझा काय संघर्ष, जवळच्या मित्रांनीही ऐकवलं की आम्हाला काय आमचं आमचं करावं लागतं आम्हाला वडिलांकडून पैसे नाही मिळत.”

ऐश्वर्याने पुढे सांगितलं की तिच्या सहकलाकाराने तिला एकदा टोमणा मारला होता. ती म्हणाली, “माझा एक सहकलाकार म्हणाला होता की मालिकेची नायिका अशी नाही दिसत. त्या छान असतात. मी फटकळ असल्याने पटकन म्हणाले की मालिकेचे नायकही असे बारीक नसतात. त्यामुळे प्लाजी तू मला नको सांगूस तू चॅनेलला जाऊन बोल. तुला तक्रार असेल तर चॅनेलकडे जा आणि बोल.”

मला अस्पृश्यासारखी वागणूक दिली – ऐश्वर्या

ऐश्वर्याने पुढे तिला तिच्या आईसमोर सेटवर वाईट वागणूक मिळाल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “सगळ्यांना असं वाटतं की ही तर चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीये. पण मी वन डे रोलही केलेत हे कोणी पाहिलंच नाहीये. लोकांनी हिच्याबरोबर व्हॅनिटी शेअर करणार नाही असंही माझ्याबद्दल म्हटलं आहे. मला अस्पृशासारखी वागणूक दिली. तेव्हा तर मी लहान होते. ११-१२वीत होते. मी कलर्स मराठीचा शो करत होते. मैत्रिणीचा रोल होता आणि चांगल्या अभिनेत्री आहेत मी नावं नाही घेत आता पण लग्नाचा सीन होता. त्या बहीण आणि वहिनीच्या भूमका करत होत्या. त्या म्हणाल्या की आमच्या व्हॅनिटीमध्ये का बसवलं आहे. ते ही पण काळजी घेत नाही की तुम्ही समोरच बोलताय किंवा आईसुद्धा आहे बरोबर. मला कलाकार म्हणून गर्दी झाल्यानंतर त्रास होतो हे समजतं पण तरी कुठल्याही माणसाला असं नाही बोललं पाहिजे.”