एजे व लीला ही पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे, त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) मालिकेतील ही पात्रे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच भरभरून मनोरंजनही करतात. सध्या मालिकेत एजे व लीलाची प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. एजे लीलासाठी विविध गोष्टी करीत असून, तो तिची काळजी घेत असल्याचे दिसते. आता ते पहिली मकर संक्रांत एकत्र साजरी करणार आहेत. त्यासाठी एजे लीलासाठी खास तयारी करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

एजे लीलाची मकर संक्रांत खास करणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लीला तिच्या सासरी आहे आणि ती एजेला शोधत आहे. एजे मात्र लीलाच्या माहेरी गेला आहे. तो त्यांच्या स्वयंपाकघरात काहीतरी बनवत असल्याचे दिसत आहे. लीलाचे वडील म्हणतात की, एजे काय करायचं ते आम्हाला सांगा. आम्ही करतो ना. त्यानंतर रेवती एजेला विचारते की, तुम्ही काय करताय ते तरी सांगा. त्यावर एजे म्हणतो, “हलव्याचे दागिने. लीलाची पहिली संक्रांत आहे आणि तिचे दागिने मी स्वत:च बनवतोय. त्यानंतर रेवती यशला व्हिडीओ कॉलवर सांगते की, यश एजे स्वत:च्या हातांनी ताईसाठी हलव्याचे दागिने बनवीत आहेत.

madhuri dixit lips turned blue while filming song pukar
माधुरी दीक्षितचे ओठ निळे पडले अन् थांबवावं लागलेलं शूटिंग…; ‘त्या’ सिनेमाला पूर्ण झाली २५ वर्षे, ‘धकधक गर्ल’ची खास पोस्ट
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Navri Mile Hitlarla
Video: एकीकडे यश-रेवतीची लगीनघाई तर दुसरीकडे लीलाच्या जीवाला धोका? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नेमकं काय घडणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “एजेमुळे गोड होणार लीलाची पहिली मकर संक्रांत…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सध्या लीला व एजेची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. एजेला तो लीलाच्या प्रेमात पडला आहे, याची जाणीव झाली आहे. या सगळ्यात लीलाच्या आयुष्यात मन्या नावाची व्यक्ती आली आहे. खरे तर हा सरस्वतीचा भाऊ विक्रांत आहे, जो वेशभूषा बदलून आला आहे. लीला व एजे यांच्यातील जवळीक वाढत असताना हा मन्या त्यांच्या आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने डोकावताना दिसतो. आता मालिकेत पुढे काय होणार, लीलाचा मकर संक्रांतीचा सण कसा साजरा होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader