Ajinkya Raut Dance Video: सोशल मीडियावर कोणते गाणे, कोणती कविता, एखादी डान्स स्टेप व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही गाणी, काही डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतात.

नुकताच शाहिद कपूरचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ओ रोमिओ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, दिशा पाटणी, नाना पाटेकर, विक्रांत मॅसी असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

चित्रपटातील एका गाण्याने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘पान की दुकान’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. या गाण्याचे बोल, चाल तसेच शाहिदने या गाण्यावर केलेल्या डान्सचे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.

आता या गाण्यावर चाहतेदेखील डान्स करत आहेत. अनेकांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने या गाण्यावर डान्स करत लक्ष वेधून घेतले आहे.

अजिंक्य राऊतचा जबरदस्त डान्स

अभिनेता अजिंक्य राऊत सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध अनुभव तो शेअर करतो. अनेकविध ठिकाणचे व्हिडीओ, फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो. काही वेळा तो डान्स व्हिडीओदेखील शेअर करतो. आता त्याने शाहिद कपूरच्या पान की दुकान या गाण्यावर डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्याने शाहिद कपूरने चित्रपटात केलेल्या डान्सप्रमाणेच डान्स केल्याचे दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ शेअर करताना त्याने मनसोक्त नाचा असेही लिहिले आहे. तसेच, शाहिद कपूरला रॉकस्टार म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

अजिंक्यने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. अभिनेत्री दीप्ती केतकरनेही कमेंट करत त्याचे कौतुक केले.

तसेच अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुकही केले आहे. एकाने लिहिले, “खूप उत्तम”, दुसऱ्याने लिहिले, “कमला डान्स”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सुपर से भी उपर”, एकाने लिहिले, “अजिंक्य क्या बात है”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे तर ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याच्याबरोबर हृता दुर्गुळेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होती. याबरोबरच ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. अभिनेता आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.