scorecardresearch

“तुझ्या रुखवतातला ट्रॉफीचा हट्ट…”, बहिणीच्या लग्नानंतर अक्षय केळकरची खास पोस्ट

अक्षय केळकरने बहिणीच्या लग्नानंतर तिच्यासाठी लिहिली खास पोस्ट

akshay kelkar, shraddha kelkar, akshay kelkar sister, akshay kelkar instagram, shraddha kelkar wedding, akshay kelkar post for sister, अक्षय केळकर, अक्षय केळकर बहीण, श्रद्धा केळकर, अक्षय केळकर इन्स्टाग्राम
(फोटो सौजन्य- अक्षय केळकर इन्स्टाग्राम)

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद जिंकल्यानंतर अभिनेता अक्षय केळकर सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अक्षयने बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर त्याचं खूप कौतुक झालं. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षय त्याच्या बहिणीच्या लग्नात व्यग्र झालेला पाहायला मिळाला. नुकतंच त्याच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला. ज्याचे काही फोटो शेअर करत अक्षयने बहिणीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

बिग बॉसच्या घरातही आपल्या कुटुंबाला अक्षय नेहमीच प्राधान्य देताना दिसला. तो नेहमीच त्याची आई, बाबा आणि बहीण यांच्याबद्दल बोलत असे. अक्षयने त्याची बहीण श्रद्धाच्या लग्नाचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय मेहंदी आणि हळदीचे व्हिडीओही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण आता बहीणचे लग्नानंतरचे फोटो शेअर करत तिचा रुखवातातील ट्रॉफीचा हट्ट पूर्ण केल्याचं अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 : “माझ्या आईनेच…” ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकरच्या पहिल्या ब्रेकअपची गोष्ट

अक्षयची इन्स्टाग्राम पोस्ट-

“माझ्याशी कचाकचा भांडायचीस, तशी भांडू नकोस! तुझा बालिशपणा पण इथेच सोडून जा! त्या सगळ्यांवर आमचाच हक्क आहे! तुझे सगळे हट्ट पूर्ण नाही करता आले पण, तुझ्या रुखवतातला Troffy चा हट्ट पूर्ण केला बरं! बाकी काय, दिल्या घरी तू सुखी रहा! आता माझ्या आमरसामध्ये पार्टनर नसेल याचा खूप खूप आनंद झालेला आहे मला! @hemant_mavlankar आमच्या घरच्या फुलाला जपशीलच याची खात्री आहेच पण तरीही, सांभाळून घे.
तुम्हा दोघांनाही, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Happy Married Life”

आणखी वाचा- Video : …अन् मुंबईच्या रस्त्यांवर ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन नाचला अक्षय केळकर

दरम्यान अक्षयच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत त्याच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयच्या बहिणीच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पण अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेत्री अमृता धोंडगे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अक्षय केळकरने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याचा बहिणीबरोबर किती चांगलं बॉन्डिंग आहे हे लक्षात येतं. त्याच्या इन्स्टाग्रामवरील लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:01 IST