Akshay Waghmare Welcomes Baby Girl : अक्षय वाघमारे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडींबद्दलच्या अपडेट त्याच्या चाहत्यांना देत असतो. अशातच नुकतीच त्याने एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.
अक्षय वाघमारे पुन्हा एकदा बाबा झाला असून त्याने नुकतीच ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्याची बायको योगिता गवळी वाघमारे हिने मुलीला जन्म दिला आहे. अक्षय व योगिता यांना एक मुलगी आहे आणि आता नुकताच त्यांच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला आहे.
अक्षय वाघमारेने पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत “सीझन २ रिलीज पोरगी झाली रे… इट्स अ बेबी गर्ल” अशी कॅप्शन दिली आहे. त्याच्या या पोस्टखाली कलाकारांसह त्याच्या अनेक चाहत्यांनीही लाइक व कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याच्या या पोस्टखाली अभिनेत्री मेघा धाडेने अभिनंदन अशी कमेंट केली आहे,मेघासह अक्षयची सहकलाकार अभिनेत्री भक्ती देसाई हिनेसुद्धा अभिनंद अशी कमेंट केली आहे.
अक्षय वाघमारेच्या बायकोचा योगिताचा काही दिवसांपूर्वी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याच्या बायकोच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडल्याचं सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओतून पाहायला मिळालं.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तो दिग्पाल लांजेकरच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून झळकला. यासह तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अक्षयने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, अक्षय वाघमारे व त्याची पत्नी योगिता गवळी वाघमारे पुन्हा आई-बाबा झाले असून सध्या त्यांच्या आयुष्यतील महत्त्वाच्या टप्प्याचा ते आनंद घेत आहेत. दोघेही पुन्हा आई-बाबा झाले असल्याने त्याच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
