akshaya deodhar gets emotional after married with hardeek joshi shared nail art photo | Loksatta

हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…

अक्षयाने नखांवरच लग्नाची तारीख कोरत नेल आर्ट केलं होतं.

हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…
अक्षया देवधरने लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: अक्षया देवधर/ इन्स्टाग्राम)

मराठी मनोरंजनविश्वातील लाडकी अक्षया देवधर व हार्दिक जोशी ही जोडी २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकली. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा-पाठकबाईंनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

अक्षया व हार्दिक दोघांनीही लग्नासाठी जय्यत तयारी केली होती. त्यांच्या मेहंदी, हळदी कार्यक्रमाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. पाठकबाईंनी हातांवर सुंदर मेहंदी आणि बोटांच्या नखांवर खास नेल आर्टही केलं होतं. लग्नाची तारीख लिहित हटके नेल आर्ट अक्षयाने केलं होतं. परंतु, आता ते काढून टाकायचे असल्याने अक्षया भावूक झाली आहे.

हेही वाचा>> “आम्हाला मार्गदर्शन करण्याबरोबरच…” अनिल कपूर यांच्या ट्वीटनंतर जितेंद्र जोशीने शेअर केली भावूक पोस्ट

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नेल आर्टचा फोटो शेअर केला आहे. “या सुंदर नखांची नक्कीच आठवण येईल” असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच आता हे नेल आर्ट काढण्याची वेळ आली आहे, असंही तिने पुढे म्हटलं आहे.

हेही वाचा>>अवघ्या एका महिन्याच्या लेकीला घरी सोडून आलिया भट्ट करतेय योगा; नेटकरी म्हणतात…

हेही वाचा>> प्राजक्ता माळीला लागले प्रेमाचे वेध? फोटो शेअर करत म्हणाली…

अक्षया व हार्दिकच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पुण्यात त्यांचा हा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर अक्षया-हार्दिकच्या घरी सत्यनारायणाची पूजाही करण्यात आली. यावेळी ते मराठमोळ्या साध्या पेहरावात दिसून आले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:54 IST
Next Story
“ही तर सौंदर्या २.०…”; गौतम विगच्या ‘त्या’ फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स