Video : "गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ..." राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्... | akshaya deodhar hardeek joshi wedding actor special ukhana for his wife video goes viral on social media | Loksatta

Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…

हार्दिक जोशीने अक्षया देवधरसाठी खास उखाणा घेतला आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…
हार्दिक जोशीने अक्षया देवधरसाठी खास उखाणा घेतला आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर शुक्रवारी (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. या दोघांचे मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रम, लग्न, रिसेप्शन सोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्न विधी झाल्यानंतर अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. हार्दिकनेही बायकोसाठी खास उखाणा तोंडपाठ केला होता.

आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा

हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी खास लूक केला होता. दोघंही पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा तयार केला होता. तर हार्दिकनेही एक उखाणा तोंड पाठ केला.

पाहा व्हिडीओ

हार्दिक उखाणा घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. “पाहा आमच्या गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ, अक्षयाचं नाव घेतो आता बघा आमच्या लग्नाचा थाट.” अगदी हसतमुख चेहऱ्याने हार्दिकने हा उखाणा घेतला.

आणखी वाचा – Video : मंगलाष्टका झाल्या, खांद्यावर उचलून घेतलं अन् पाठकबाईंनी राणादाच्या गळ्यात हार घालत केलं किस; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील खास क्षण

हार्दिकने उखाणा घेताच अक्षयाही अगदी लाजली. तसेच दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखं आहे. या दोघांच्या लग्नाला कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. तसेच अनेकजण हार्दिक व अक्षयावर त्यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 13:09 IST
Next Story
सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”