Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच | akshaya deodhar hardeek joshi wedding actress mehendi look and decoration video goes viral on social media | Loksatta

Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरच्या हातावर सजली हार्दिक जोशीच्या नावाची मेहंदी. पाहा हा खास व्हिडीओ

Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच
अक्षया देवधर हार्दिक जोशी लग्न

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. हार्दिक व अक्षया दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्नाच्या तयारीचे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत आहेत. मित्र व अभिनेता अमोल नाईकने हार्दिकच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.

आता अक्षयाने तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. अक्षयाच्या मेहंदी सोहळ्यासाठी फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवाय छोटासा स्टेज तयार करण्यात आला आहे. तसेच तिने मेहंदीसाठी खास लूक केला आहे.

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला पाठकबाईंच्या घरी घेऊन गेला, अक्षया म्हणते…

लेव्हेंडर रंगाचा आकर्षक ड्रेस अक्षयाने परिधान केला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. शिवाय तिचा लूकही अधिक आकर्षक दिसत आहे. या सुंदर ड्रेसवर अक्षयाने आकर्षक दागिने परिधान केले आहे. बिंदी, कानातले तिने घातले आहेत. शिवाय तिच्या या खास लूकचं तिचे चाहतेही कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 17:43 IST
Next Story
“तुला बाहेर काढलं…” तेजस्विनी लोणारीच्या एक्झिटवर बिग बॉसच्या स्पर्धकाची प्रतिक्रिया