scorecardresearch

Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरने पती हार्दिक जोशीसाठी खास उखाणा घेतला आहे. त्याचीच एक झलक पाहूया.

Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरने पती हार्दिक जोशीसाठी खास उखाणा घेतला आहे. त्याचीच एक झलक पाहूया.

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. आता अक्षयाने नवऱ्यासाठी खास उखाणा घेतला आहे.

आणखी वाचा – Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर

हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी खास लूक केला होता. दोघंही पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. आता दोघांच्या रिसेप्शन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हार्दिक चक्क घोड्यावर बसून मंडपात आला.

पाहा व्हिडीओ

आता रिसेप्शनपूर्वी अक्षयाने हार्दिकसाठी भला मोठा उखाणा घेतला आहे. उखाणा घेण्यापूर्वी अक्षया म्हणते, “हा उखाणा मी आणि माझी जवळची मैत्रीण रिचा आपटे आम्ही दोघींनी मिळून तयार केला आहे.” त्यानंतर अक्षया उखाणा घ्यायला सुरुवात करते.

आणखी वाचा – Video : ‘मला पिरतीच्या झुल्यात…’ बायकोसमोर चक्क राणादाने लावणीवर धरला ठेका, उपस्थितही बघतच बसले अन्…

Photos : जांभळ्या रंगात राणादा-पाठकबाईंचा राजेशाही थाट; अक्षया-हार्दिकच्या रिसेप्शनचे खास फोटो पाहिलेत का?

उखाण्यामध्ये ती “अक्षया हार्दिक जोशी” असं स्वतःचं संपूर्ण नाव उच्चारते. ते ऐकून उपस्थितही टाळ्या वाजवतात. बायको उखाणा घेत आहे हे पाहून हार्दिकही अगदी खूश होतो. शिवाय अक्षयाकडे एकटक पाहत बसतो. अक्षयाने घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:53 IST

संबंधित बातम्या