Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर | Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding celebrity vidhi look photos and video goes viral on social media | Loksatta

Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाचा विधी लूक आता समोर आला आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाचा विधी लूक आता समोर आला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडत आहे. यादरम्यानचे बरेच व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लगीनघाई, आईच्या हट्टापायी थेट अक्षयाच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला गेला होता हार्दिक जोशी अन्…

हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी खास लूक केला आहे, दोघंही विधी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत.

गळत्या ठुशी, काळ्या मण्यांनी भरलेलं मंगळसुत्र, हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ असा अक्षयाचा लूक आहे. तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे.

दोघांनी पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. अक्षया व हार्दिकचा हा लूक चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत आहे.

पाहा व्हिडीओ –

शिवाय अक्षयाच्या पायातील जोडवीही विशेष लक्ष वेधून घेत आहे. अक्षया व हार्दिकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:19 IST
Next Story
राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर