"लग्नाबद्दल काहीही विचार..." राणादाने सांगितलेले पाठकबाईंबरोबर गुपचूप साखरपुडा करण्यामागचं खरं कारण | Akshaya Deodhar-Hardeek Joshi wedding why they secretly got engaged know the exact reason nrp 97 | Loksatta

“लग्नाबद्दल काहीही विचार…” राणादाने सांगितलेले पाठकबाईंबरोबर गुपचूप साखरपुडा करण्यामागचं खरं कारण

खास कारणामुळे त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेला म्हणजे ३ मे रोजी साखरपुडा केला.

“लग्नाबद्दल काहीही विचार…” राणादाने सांगितलेले पाठकबाईंबरोबर गुपचूप साखरपुडा करण्यामागचं खरं कारण
अक्षया देवधर हार्दिक जोशी

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा विवाहसोहळा आज (२ डिसेंबर) पुण्यात पार पडला. पुण्यात पारंपारिक पद्धतीने ते दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच त्यावर अनेकांन कमेंट करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांची लव्हस्टोरी प्रचंड खास आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने लग्न जरी थाटामाटात केले असले तरी साखरपुडा मात्र गुपचूप केला होता. यामागचे कारणही हार्दिकने सांगितले होते.

अभिनेता हार्दिक जोशी काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने जीव माझा रंगला या मालिकेबरोबरच त्याच्या लव्हस्टोरीबद्दलही भाष्य केले. यावेळी त्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुपचूप पद्धतीने साखरपुडा का केला? यामागचे कारण काय होते? यावर भाष्य केले होते. याच खास कारणामुळे त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेला म्हणजे ३ मे रोजी साखरपुडा केला.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

हार्दिक जोशी काय म्हणाला?

“मी तिला लग्नाबद्दल विचारल्यानंतर तिने माझी काही अडचण नाही, पण तुला एकदा घरी येऊन बोलावे लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर मी अक्षयाच्या घरी गेलो. तोपर्यंत मी लग्नाबद्दल काहीही विचार केला नव्हता. मी त्यांना सर्व काही सांगितलं. त्यावर तिच्या कुटुंबाने ठिक आहे आम्ही विचार करुन सांगतो, असे म्हटलं होतं.”

“यानंतर मी माझी मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यात व्यग्र झालो. त्याच मालिकेच्या एका भागाचे शूटींग करण्यासाठी मी जात असताना मला अचानक अक्षयाचा फोन आला. मी तो उचलला तर ती म्हणाली तू मेसेज वाचला का? फोटो बघितलास का? असे विचारले. त्यावर मी नाही असं तिला म्हटलं. फोटो बघ आणि फोन कर, असं म्हणत तिने फोन ठेवला. मी तो फोटो पाहिला तर त्यावर १, २, ३ आणि २७, २८ अशा तारखा लिहिल्या होत्या. या तारखा साखरपुड्यासाठी काढलेल्या होत्या.

मला हे सर्व २० एप्रिलला समजले, म्हणजे साखरपुड्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असताना मला हे समजले. त्यात तिची इच्छा होती की तिच्या वाढदिवसाला साखरपुडा करायचा. तिचा जन्म अक्षय्य तृतीयाचा आहे. म्हणून मग ३ मे रोजी साखरपुडा केला”, असे हार्दिकने त्यावेळी सांगितले होते.

आणखी वाचा : Akshaya Hardeek Wedding Live : “नांदा सौख्यभरे…” अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न

दरम्यान आता अखेर अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी विवाहबंधनात अडकली. आज (२ डिसेंबर) त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पुण्यात पारंपारिक पद्धतीने ते दोघेही विवाहबंधनात अडकले. यावेळी ते दोघेही फार आनंदात होते. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटोही समोर आले आहेत. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नबंधनात अडकल्यानंतर अनेकांनी कमेंट करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:19 IST
Next Story
आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट, आता अपूर्वा नेमळेकरला करायचंय स्वयंवर, म्हणाली…