Akshaya deodhar posted a special video for hardeek joshis birthday rnv 99 | हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षया देवधरची खास पोस्ट, म्हणाली, "तू माझ्या आयुष्यात..." | Loksatta

हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षया देवधरची खास पोस्ट, म्हणाली, “तू माझ्या आयुष्यात…”

अक्षयाने फोटो आणि छोट्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करुन तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षया देवधरची खास पोस्ट, म्हणाली, “तू माझ्या आयुष्यात…”

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. हे कपल नेहमीच एकमेकांबरोबरचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतं. अशातच आज हार्दिक जोशीचा वाढदिवसानिमित्त अक्षयाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : स्वतः आलिया भट्ट नव्हे तर ‘ही’ व्यक्ती सांभाळते तिचे आर्थिक व्यवहार, मुलाखतीदरम्यान केला खुलासा

अक्षयाने फोटो आणि छोट्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करुन तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या वहिडिओची सुरुवात एका छोट्या व्हिडीओ क्लिपने होते, ज्यात हार्दिक चहा पिता पिता मजेशीर हावभाव करताना दिसत आहे. त्यानंतर हार्दिक आणि अक्षयाचे काही रोमँटिक फोटो दिसत आहेत.

हा स्पेशल व्हिडीओ पोस्ट करत अक्षयाने हार्दिकला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, “माझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी जग आहेस. तू माझे कायमचे मनोरंजन आहेस. तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

हेही वाचा : Video: पाठकबाईंची हटके बॅचलर पार्टी, लुंगी नेसून धरला प्रसिद्ध गाण्यावर ताल

हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. हे दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अलीकडेच हार्दिकने त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या केळवणाचा फोटो शेअर केला होता. तर काही दिवसांपूर्वी अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत बॅचेलर पार्टी करताना दिसली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एकाचवेळी दोन व्यक्तींना केलं होतं डेट, आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा

संबंधित बातम्या

राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल
Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल
Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
“त्याच्या चाळीतल्या…” समीर चौगुलेंनी दत्तू मोरेच्या चाळीबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश