अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही टीव्हीवरील लोकप्रिय जोडी काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि नेहमीच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पाठकबाई म्हणजेच अक्षय देवधरने एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अक्षय देवधर आणि हार्दिक जोशी मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. दोघंही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. आताही अक्षया देवधरने तिच्या इन्स्टाग्रामवर हार्दिकबरोबरचा सुंदर रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने खूपच रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. अक्षयाच्या या पोस्टवर हार्दिकने कमेंट केली आहे. आणखी वाचा- “मला आर्मीत करिअर करायचं होतं पण…” राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचं खरं कारण अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर हार्दिक बरोबरचा फोटो शेअर करताना एक हिंदी शायरी पोस्ट केली आहे. तिने लिहिलं, "मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना, बस ये समझ लो लफ्ज कम मोहब्बत ज्यादा है!" अक्षयाच्या या फोटोवर कमेंट करताना हार्दिकनेही 'हार्ट' इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. अक्षयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आणखी वाचा- Dream Girl 2 Teaser: बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल २’चा टीझर प्रदर्शित, स्त्री वेशातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का? दरम्यान अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी डिसेंबर २०२२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या दोघांनी 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील मालिकेत एकत्र काम केलं होतं आणि याच मालिकेच्या सेटवर झालेली या दोघांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. मात्र याबद्दल या दोघांनी कधीच जाहीर भाष्य केलं नाही. अखेर मे २०२२ रोजी त्यांचा साखरपुडा झाला त्यावेळी चाहत्यांना पहिल्यांदा त्यांच्या डेटिंगबद्दल कळलं होतं. रील लाइफमधली ही जोडी खऱ्या आयुष्यातही आता पती-पत्नी झाले आहेत.