scorecardresearch

पाठकबाई राणादाच्या प्रेमामध्ये सैराट! ‘तो’ फोटो शेअर करत अक्षया म्हणाली, “हा फक्त माझा…”

अक्षया देवधरची नवऱ्यासाठी खास पोस्ट, काय म्हणाल्या पाठकबाई?

hardeek joshi Akshaya deodhar
अक्षया देवधरची नवऱ्यासाठी खास पोस्ट, काय म्हणाल्या पाठकबाई?

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर व हार्दिक जोशी. अक्षया व हार्दिकने खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी २ डिसेंबरला लग्न करत या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता अक्षया व हार्दिक त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे त्यांच्या प्रत्येक पोस्ट, व्हिडीओ व फोटोंमधून दिसून येतंच.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? लेकही दिसते फारच सुंदर

आताही अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हार्दिकबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही अगदी आनंदी दिसत आहेत. अक्षयाने लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी हार्दिकसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तर अक्षयाची पोस्ट पाहता हार्दिकनेही यावर कमेंट केली आहे.

अक्षया हार्दिकबरोरचा सुंदर फोटो शेअर करत म्हणाली, “हा फक्त माझा माणूसच नव्हे तर माझं घर, माझी विश्रांती, माझं हृदय आणि माझं सुरक्षित ठिकाण आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”. अक्षयाच्या या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षया व हार्दिकच्या फोटोचं सगळेच कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

हार्दिकनेही अक्षयाची ही पोस्ट पाहून “आय लव्ह यू” अशी कमेंट केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आता लग्नानंतर दोघंही आपापल्या कामाला लागले आहेत. हार्दिक लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:22 IST