Akshaya Deodhar New Business : 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजही अक्षयाला महाराष्ट्रातील घराघरांत मालिकेतल्या पाठकबाई या नावाने ओळखलं जातं. पाठकबाई अन् राणादाची जोडी प्रेक्षकांमध्ये आताही प्रसिद्ध आहे. हे दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतात. अक्षयाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अक्षया देवधरने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत नवीन व्यवसाय सुरू केल्याचं जाहीर केलं. पाठकबाई आता बिझनेसवुमन झाल्या आहेत. तिने मैत्रिणींच्या साथीने साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. अक्षयाने 'भरजरी' हे साड्यांचं नवीन दालन पुण्यात सुरू केलं आहे. साड्यांच्या नव्या व्यवसायाची पहिली झलक अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्राम शेअर केली आहे. यावेळी अक्षयाचा नवरा अभिनेता हार्दिक जोशी सुद्धा उपस्थित होता. हेही वाचा : Bigg Boss Marathi - “हे लोक घरातले गुंड…”, प्रसिद्ध निर्मात्यांनी जान्हवीसह वैभव-अरबाजला सुनावलं; म्हणाले, “अतिशय वाईट…” अक्षया देवधरने सुरू केला नवीन व्यवसाय अक्षया ( Akshaya Deodhar ) कॅप्शनमध्ये लिहिते, "भरजरी- नक्षीदार साड्यांचे दालन’ यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या साड्या म्हणजे परंपरा अन् सौंदर्य यांचा सुंदर संगम आहे. आमच्या येथील प्रत्येक साडी ही आपला वारसा दर्शवते, प्रेमाने विणलेला आणि परिश्रमाने तयार केलेला… आमच्याबरोबर या सुंदर प्रवासात सामील व्हा, याठिकाणी पारंपरिक डिझाईन्सबरोबर आम्ही काही आधुनिक शैली एकत्र आणत आहोत." अक्षयाला या नव्या व्यवसायात तिच्या दोन मैत्रिणी निधी आणि माधुरी यांची साथ लाभली आहे. नव्या दालनाचं उद्घाटन करताना अक्षयाचा नवरा हार्दिक जोशी देखील उपस्थित होता. या दोघांनी एकत्र मिळून दालनात पूजा केली अन् या नव्या व्यवसायाचा शुभारंभ केला. हेही वाचा : Devara Part – 1 : ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं संगीतकाराने केलंय कॉपी? नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “काही वर्षांपूर्वी…” अक्षयाने सुरू केलं 'भरजरी' दालन ( Akshaya Deodhar ) दरम्यान, अक्षया देवधरवर ( Akshaya Deodhar ) सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. भार्गवी चिरमुले, ऋतुजा बागवे, शिवानी बावकर, सुरुची अडारकर, अदिती द्रविड, अभिज्ञा भावे, अमोल नाईक या कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.