Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल |amitabh bachchan 80 birthday special episode kbc 14 actor and his wife jaya bachchan gets emotional watch video | Loksatta

Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

‘कौन बनेगा करोडपती’ शोचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी यांना अश्रू अनावर झाले असल्याचं दिसत आहे.

Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
‘कौन बनेगा करोडपती’ शोचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी यांना अश्रू अनावर झाले असल्याचं दिसत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ शोचा प्रत्येक भाग प्रेक्षक आवडीने पाहतात. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या शोचे लाखो चाहते आहेत. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक हा दिलखुलासपणे अमिताभ यांच्याशी गप्पा मारताना दिसतो. आता ‘केबीसी’च्या नव्या भागामध्ये बिग बी यांचा लेक अभिषेक बच्चन सहभागी होणार आहे. यादरम्यानचेच काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण यावेळी अमिताभ यांना अश्रू अनावर झाले असल्याचं एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर

११ ऑक्टोबरला अमिताभ यांचा वाढदिवस आहे. यादिवशीचा ‘केबीसी’चा भाग अमिताभ बच्चन बर्थडे स्पेशल असणार आहे. त्यांचा हा ८०वा वाढदिवस आहे. याचनिमित्त अमिताभ यांची पत्नी जया बच्चन ‘केबीसी’च्या मंचावर हजेरी लावणार आहेत. पत्नी अचानक मंचावर येताच अमिताभ यांना अश्रू अनावर झाले असल्याचं ‘केबीसी’च्या व्हायरल प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ

अभिषेक या व्हिडीओमध्ये सरप्राईज म्हणून आपल्या आईला मंचावर बोलावताना दिसत आहे. जया बच्चन यांना पाहून अमिताभ त्यांना मिठी मारतात. यादरम्यान भावुक होत ते रडू लागतात. अभिषेकसह जया बच्चनही हॉट सीटवर बसलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. अमिताभ यांच्याबाबत जया असा एक किस्सा सांगतात तो ऐकून अमिताभ भावुक होतात. तसेच अभिषेकही भावुक होतो.

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत पहिल्यांदा स्पष्टच बोलला दिग्दर्शक ओम राऊत, म्हणाला, “लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून…”

जया बच्चन बिग बींबाबत सांगत असलेला किस्सा नेमका कोणता? हे प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये कळेलच. पण बिग बी बर्थ डे स्पेशल ‘केबीसी’चा हा नवा भाग रंजक ठरणार आणि आपल्या सुपरस्टारचे अनेक किस्से प्रेक्षकांना ऐकायला मिळणार एवढं नक्की…

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2022 at 10:58 IST
Next Story
प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याची आत्महत्या, पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने होता चिंतेत