बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी तसेच कामासंदर्भातील माहिती त्यामार्फत देत असतात. अनेकदा ते इतर घडामोडींबद्दलही व्यक्त होत असतात तसेच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनच्या कामाचं कौतुक करत असतात. यासह ते यामार्फत इतर कलाकारांच्या संपर्कातही राहतात. अशताच आता त्यांनी प्रीती झिंटाबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत तिच्याकडे तक्रार केली आहे.
अमिताभ बच्चन सध्या ‘कौण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. यावेळी आगामी ‘बटवारा १९४७’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्री प्रीती झिंटाने या कार्यक्रमात हजेरी लावली असून त्यावेली बिग बी तिला त्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मॅसेज केलेला परंतु, तिने रिप्लाय दिला नाही म्हणत नाराजी व्यक्त केली. आता प्रीतीने याबद्दल प्रतिक्रिया देत बिग बींचा गैरसमज दूर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी केली तक्रार
सोनी टिव्हीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर ‘कौण बनेगा करोडपती’मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन प्रीतीला म्हणाले, “मला तुझ्याकडे एक तक्रार करायची आहे. तक्रार अशी आहे की मी ३१ जानेवारीला तुला तुझ्या वाढदिवशी शुभेच्छांचा मॅसेज केला होता. तू मला एकदाही त्यावर उत्तर दिलं नाही.” अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाचं उत्तर देत प्रीती म्हणाली, “प्लीज अमितजी मी नेहमी तुम्हाला उत्तर देते. पण एक आठवड्यानंतर”.
अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रीतील एक्सवरील शुभेच्छांचा स्क्रीनशॉट दाखवला. यावेळी त्यांनी तिला तो वाचूनही दाखवला. बिग बी म्हणाले, “प्रीती झिंटा जिथे कुठे असशील, तू माझ्या कुठल्याही एसएमएसला रिप्लाय देत नाहीस हा.हा.हा… तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खूप प्रेम नेहमी आनंदी राहा”.
प्रीती झिंटा आणि सनी देओल त्यांच्या आगामी ‘बटवारा १९४७’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झाले होते. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित असून, देशाच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण घटनेमुळे सामान्य माणसांना सहन कराव्या लागलेल्या वेदना आणि त्यांच्या संघर्षाबद्दल चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे.
