scorecardresearch

“काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट

“मी अजून बाहेर पडले नाहीये…”

“काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट
अमृता देशमुख

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. इतर पर्वांप्रमाणेच ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्वही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाचे पर्व हे पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या या शोमध्ये येत्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्यामुळे मोठा ट्विस्ट आला होता. विकास सावंत शनिवारी (१७ नोव्हेंबर) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख हिचाही प्रवास संपुष्टात आला आहे. यानंतर तिने एक पोस्ट केली आहे.

अमृता देशमुख हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच मनापासून आभार, असे म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरातून अमृता देशमुख बाहेर; विकास सावंत पाठोपाठ ‘पुण्याच्या टॉकरवडी’ची एग्झिट

अमृता देशमुखची पोस्ट

“बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडलेय या दु:खातून मी अजून बाहेर पडले नाहीये…थोडक्यात ऑल इज नॉट वेल… काय चूक, काय बरोबर, काय फेअर, काय अनफेअर…याचं विश्लेषण तेव्हाही सुरु होतं आणि आत्ताही सुरु आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळतेय… तेव्हा तुम्ही तुमच्यातील सकारात्मक उर्जा ही कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा म्हणजे सगळं वाटेल.. All Is Well! धन्यवाद”, असे अमृता देशमुखने म्हटले आहे.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले डबल एलिमिनेशन, विकास सावंत पडला बाहेर

दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्याने अमृताला खेळातून बाहेर पडावे लागेल. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. पण नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक नॉमिनेशन टास्कमध्ये अमृताला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केलेलं पाहायला मिळालं. आता विकास व अमृता घरातून बाहेर पडल्यानंतर खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांना नवे डावपेच व आणखी तल्लख बुद्धीने खेळ खेळावा लागणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 09:01 IST

संबंधित बातम्या