scorecardresearch

Premium

“अशक्तपणा, ताप अन्…”, लग्नानंतर अमृता देशमुख पडली आजारी, अभिनेत्रीची आई म्हणाली, “जिद्दीने तिने…”

लग्नानंतर अमृता देशमुखने पुन्हा सुरू केलं काम! आजारी पडलेल्या लेकीसाठी आईची खास पोस्ट

amruta deshmukh mother vaishali pens emotional post
अमृता देशमुखच्या आईने शेअर केली खास पोस्ट

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा १८ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. शाही विवाहसोहळ्यानंतर आता प्रसाद-अमृताने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

‘पुण्याची टॉकरवडी’ म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लग्नानंतर अभिनेत्री काही दिवस आजारी होती. तरीही तिने नाटकाचे सलग प्रयोग केले. याबाबत अमृताची आई वैशाली देशमुख यांनी पोस्ट शेअर करून लाडक्या लेकीचं कौतुक केलं आहे.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Ram Lalla Murti Has Changed Ayodhya Ram Mandir Arun Yogiraj Reaction Says This is Not My Work How Krishna Sheela Was Carved
“रामलल्ला बदलले, हे माझे काम नाही..”, मूर्तिकार अरुण योगीराज यांची माहिती, म्हणाले, “मूर्ती तयार झाली त्यावेळेस..”
Woman Seeks Divorce Husband
मधुचंद्रासाठी पती गोव्याऐवजी अयोध्येला घेऊन गेला, संतापलेल्या पत्नीचा थेट घटस्फोटासाठी अर्ज
Knife attack on young woman on road in Nalasopara
नालासोपार्‍यात भर रस्त्यात तरूणीवर चाकू हल्ला; प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाचे कृत्य

अमृता देशमुखच्या आईची पोस्ट

The show must go on… !
प्रत्येक कलाकारासाठी हे ब्रीदवाक्य असतं…पण, प्रत्यक्षात हे किती कठीण असतं हे ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ठाऊक…
अंगात 100 ताप…दोन वाक्य बोललं की येणारा खोकला… तापामुळे आलेला अशक्तपणा… पुरेशी न झालेली झोप.. आणि त्यात प्रवास या अशा परिस्थितीत अमृताने नियम व अटी लागू या नाटकाचे तीन दिवसांत सलग चार प्रयोग केले.

त्यातला पहिला प्रयोग बोरिवली आणि नंतरचे पुण्यात…प्रसाद, आम्ही सगळे आणि डॉक्टर तिच्या पाठीशी होतोच पण ज्या जिद्दीने तिने हे प्रयोग केले त्याला तोड नाही…कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात सुध्दा आले असणार तिचे आजारपण…पण त्यांचा मिळणारा जिवंत प्रतिसाद हीच तिची खरी willpower …!
अमृता तुझा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो!
रंगभूमी पुन्हा एकदा गाजवण्यासाठी लवकरात लवकर बरी हो!

दरम्यान, अमृता देशमुख-प्रसाद जवादे या दोघांची जोडी ‘बिग बॉस’मराठीच्या चौथ्या पर्वामुळे चर्चेत आली होती. या कार्यक्रमात दोघंही एकत्र सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांची मैत्री झाली पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी जुलैमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला. दोघांच्या नुकत्याच पार पडलेल्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta deshmukh mother vaishali pens emotional post for her daughter because she is not well sva 00

First published on: 28-11-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×