Amruta Deshmukh-Prasad Jawade Dance: अभिनेत्री अमृता देशमुख व तिचा पती प्रसाद जवादे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेत असतात. ते अनेक विनोदी रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तसेच, त्यांच्या आयुष्यातील खास क्षणही प्रेक्षकांबरोबरच शेअर करतात.

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखचा डान्स

आता अमृताने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद आणि अमृता डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘सज धज के’ या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

कलाकारांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तुम्हा दोघांना एकत्र बघून खूप छान वाटतं.” दुसऱ्या एकाने लिहिले, “किती गोड”,  अमृताचे कौतुक करत एका चाहत्याने लिहिले, “प्रसाद सर खूप नशीबवान आहेत. कारण त्यांची पत्नी खूपच सुंदर आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही दोघेही किती छान डान्स करता.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जबरदस्त.” एका नेटकऱ्याने लिहिले, “डान्स स्टेप खूप छान आहेत.” प्रसाद आणि अमृताच्या डान्सचे कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले.

अभिनेत्री अमृता देशमुख सध्या लक्ष्मी निवास मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिने या मालिकेत सई ही भूमिका साकारली आहे. विश्वाला वेळोवेळी मदत करणारी, त्याच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभी राहणारी सई प्रेक्षकांचे मन जिंकून घेते.

प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं तर तो नुकताच पारू या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली होती. आईवर खूप प्रेम करणारा, तिचा आदर करणारा, ती म्हणेल ते करण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा, कुटुंबाप्रति असणाऱ्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडणारा, पारूवर प्रचंड प्रेम करणारा प्रेमळ असा आदित्य प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

काही दिवसांपूर्वी पारू मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अभिनेता कोणत्या भूमिकेतून किंवा कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.