छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. बिग बॉसची मराठीची तिन्ही पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यंदाचे पर्व देखील  पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आता फॅमिली वीक रंगणार आहेत. यात अभिनेत्री अमृता धोंगडेचे वडील हे सहभागी झाल्याचे दिसत आहे. अमृताच्या वडिलांनी तिला ‘अपूर्वा नेमळेकरकडून काही तरी शिक’ असा सल्ला दिला आहे.

कलर्स वाहिनीने नुकतंच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक रंगणार असल्याचे जाहीर केले जाते. त्या दरम्यान अमृता धोंगडेचे वडील बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतात. यावेळी त्यांनी अमृताला अनेक सल्ले दिले आहेत. तसेच प्रसाद जवादेची खिल्लीही उडवली आहे.
आणखी वाचा : “काय फेअर, काय अनफेअर…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या अमृता देशमुखची पहिली पोस्ट

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
dombivli, nandivali, dombivli crime news
डोंबिवलीत नांदिवली येथे पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याच्या संशयातून चाकू हल्ला
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

“बिग बॉसच्या घरात अमृता धोंगडेचे वडील हे सर्व सदस्यांसमोर तिची शाळा घेताना दिसत आहेत. अमृता खबरदार तुला आताच सांगून ठेवतोय यापुढे कधीच रडायचं नाही. सारखं सारखं रडत बसायचं नाही. महेश मांजरेकर हे आपले गुरु आहेत. गुरु हा सर्वात मोठा असतो. तो आपल्या चुका दाखवतो. ते चावडीवर येऊन जे सांगतात त्यातून वाईट वाटून घ्यायचं नाही.”

“त्यावेळी थोडा ब्रेक घ्यायचा, ते काय बोलतात ते ऐकायचं आणि मग त्यांना आपली बाजू सांगायची. सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण…, हे तिकडून शिकून घे” असं त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी अमृताच्या वडिलांनी अपूर्वा नेमळेकरच्या दिशेने हात केला. त्यावर अमृताने ‘मी कोणाचं ऐकणार नाही’, असे म्हटले. ‘नाहीतर प्रसादसारखं करं’, असेही सांगत त्याची खिल्ली उडवली. यानतंर अपूर्वाने अमृताला “तू आणि तुझे बाबा सारखेच आहात”, असे सांगितले. राजश्री मराठीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

दरम्यान छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व २ ऑक्टोबर पासून सुरु झाले. या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. दिवसेंदिवस येणारे ट्वीस्ट, खेळ, होणारे वाद, चावडीवर घेतली जाणारी शाळा यामुळे हे पर्व चर्चेत राहिले. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, आरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत. आता केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.