Bigg Boss Marathi 5 Trophy First Look: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व गेली ६८ दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघे दोन दिवस बाकी आहेत. पण यंदाच्या विजेत्याला मिळणारी ट्रॉफी कशी असेल, याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. अखेर या पर्वाच्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे. आता या शोचा ग्रँड फिनाले रविवारी होणार आहे. त्याआधी या शोमध्ये आज अमेय वाघ व अमृता खानविलकर पाहुणे म्हणून येणार आहेत.

अमृता खानविलकर व अमेय वाघ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी बिग बॉसच्या घरात आले, त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीचे अनावरण केले. बिग बॉस मराठी सुरू होऊन ६८ दिवस झाले आहेत. अशातच आता पहिल्यांदाच या पर्वाच्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीची झलक पाहायला मिळाली आहे. ज्या ट्रॉफीसाठी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक गेली ७० दिवस विविध टास्क खेळत आहेत, ती ट्रॉफी पाहिल्यानंतर या सहाही सदस्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.

हेही वाचा – “खेळ अजून संपलेला नाही”! Bigg Boss Marathi मध्ये परतणार रितेश देशमुख; म्हणाला, “या सीझनचा सर्वात मोठा धक्का…”

बिग बॉस मराठीत सध्या सहा स्पर्धक आहेत. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार व अंकिता प्रभू वालावलकर हे टॉप ६ सदस्य आहेत. यापैकी एक सदस्य आज बिग बॉसच्या घराचा निरोप घेईल. ग्रँड फिनालेच्या दोन दिवसाआधी एका स्पर्धकाला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे, पण त्याआधी या पर्वाच्या विजेत्याला मिळणारी ट्रॉफी कशी असेल त्याची झलक दाखवण्यात आली.

हेही वाचा – Video: ग्रँड फिनालेआधी बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; घोषणा ऐकताच स्पर्धकांना बसला धक्का, नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 5 Trophy first look
बिग बॉस मराठी ५ च्या विजेत्याला मिळणार ही ट्रॉफी (फोटो – कलर्स मराठी)

हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने नाकारली बिग बॉस १८ची ६५ कोटी रुपयांची ऑफर, कोण आहे ती?

चक्रव्यूह, बिग बॉसचा लोगो असलेला एक डोळा आणि त्यावर लिहिलेलं विजेत्याचं नाव अशी ही ट्रॉफी असेल. ही ट्रॉफी पाहिल्यानंतर टॉप ६ सदस्य आश्चर्यचकित झाले. ज्या ट्रॉफीसाठी मागील ६८ दिवसांपासून ते या घरात आहेत, त्या ट्रॉफीची झलक त्यांना अखेर ग्रँड फिनालेच्या दोन दिवसाआधी पाहायला मिळाली आहे.

Story img Loader