Amruta Khanvilkar emotional post: अमृता खानविलकर सध्या तिच्या ‘लग्नपंचमी’ या नाटकामुळे चर्चेत आहे. मधुंगधा कुलकर्णी लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामध्ये अमृताबरोबर स्वप्नील जोशीदेखील प्रमुख भूमिकेत आहे.

याबरोबरच अमृता नुकतीच तस्करी या वेब सीरिजमध्ये दिसली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचे कौतुक झाले. इमरान हाश्मी, नंदिश संधू हे कलाकार त्यात महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.

अमृताच्या विविध चित्रपट, वेब सीरिज, डान्स यांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. त्याबरोबरच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टचीदेखील वेळोवेळी चर्चा होते. अभिनेत्री वेळोवेळी विविध ठिकाणचे फोटो, व्हिडीओ शेअर करते. चाहतेदेखील त्यावर व्यक्त होताना दिसतात.

आता अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. अमृताने नुकतेच आईसह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर तिने तेथील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“एक साधा विचार आणि देवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा यांमुळे इतका समाधान देणारा अनुभव…”

अभिनेत्रीने लिहिले, “काही दिवसांपूर्वी जर मी स्वतःलाच सांगितलं असतं की, मी व्यंकटेश्वरासमोर उभी असेन, तर कदाचित मलाच त्यावर विश्वास बसला नसता; पण काल मी खरेच तिथे उभी होते.”

“एक साधा विचार आणि देवाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा यांमुळे इतका समाधान देणारा अनुभव मिळाला की, नक्कीच हे त्याचंच बोलावणं वाटतं.”

पुढे तिने ओम राऊतला टॅग करत लिहिले की, मला या प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद! तसेच तिने पुढे लिहिले की, अमरजी आणि वासूजी यांनी या संपूर्ण अनुभवात अक्षरशः हात धरून साथ दिली, त्याबद्दलही मनापासून धन्यवाद!

शेवटी तिने लिहिले, “कधी कधी जेव्हा देवाची इच्छा असते, तेव्हा त्यानं दाखवलेल्या मार्गावरून चालत जावं.”

अमृताने तिच्या आईसह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. तिने प्रवासादरम्यानचे, मंदिर परिसरातील काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. तसेच, अनेकांनी ती सुंदर दिसत असल्याचेदेखील सांगितले आहे.