Angad Mhaskar Second Marriage with Neha Phadke : स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ आणि ‘अबोली’ या प्रसिद्ध मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय मराठी अभिनेता अंगद म्हसकर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. अंगदने नेहा फडके हिच्याशी २० जुलै २०२६ रोजी अगदी साधेपणाने व मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्नाची गाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘From here to forever’ अशी पोस्ट शेअर करत त्याने नेहावरील प्रेमाची कबुली दिली होती. आता त्यांच्या साध्या विवाहसोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहते व कलाकार या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

अभिनेता अंगद म्हसकरने दुसरं लग्न केलं आहे. अंगदने नेहा फडके हिच्याशी साधेपणाने लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहे.

अंगद म्हसकर व नेहा फडके यांचं लग्न २० जुलै रोजी अगदी साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. काही जणांनी अंगदच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर केले आणि त्याला व नेहाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच पोस्ट अंगदने रिपोस्ट करून सर्वांचे आभार मानले आहेत.

पाहा अंगद म्हसकरच्या लग्नाचा फोटो

angad-mhaskar-second-marriage-neha-phadke-wedding-photos
अंगद म्हसकर व नेहा फडके यांच्या लग्नाचा फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी दिलेली प्रेमाची कबुली

स्टार प्रवाहच्या ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अंगद म्हसकरने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. अंगदने नेहाबरोबरचा कारमधील एक सेल्फी शेअर करून ‘From here to forever’ असं कॅप्शन दिलं होतं.

अंगद म्हसकरचं पहिलं लग्न

अंगद म्हसकरचं पहिलं लग्न अनन्याशी झालं होतं. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. अंगद म्हसकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘अबोली’ मालिकेसह ‘लोकमान्य’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘मुंबई पुणे मुंबई’ अशा चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अंगद म्हसकरने नेहा फडकेशी लग्न केल्यानंतर त्याला या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.