छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ १७वं पर्व १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपल्यापासून प्रेक्षकांचं बिग बॉसच्या १७व्या पर्वाकडे लक्ष लागून राहिलं होतं. काही दिवसांपूर्वी नव्या प्रोमोमधून सलमान खानने बिग बॉसचं १७वं पर्व कधीपासून सुरू होणार हे जाहीर केलं. हेही वाचा - Video: शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल यंदाची बिग बॉसची थीम सिंगल विरुद्ध कपल असणार आहे. यामधील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. 'पवित्रा रिश्ता' फेम अंकिता लोखंडे यंदाच्या बिग बॉस पर्वात झळकणार असल्याचं निश्चित झालं आहे. अशातच आता अंकिताबाबत अजून एक अपडेट समोर आली आहे. हेही वाचा – रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात झळकणार बॉबी देओल; त्याचा जबरदस्त लूक पाहून चाहते म्हणाले, “सिस्टम हँग केलं…” बिग बॉसच्या १७व्या पर्वात अंकिता पती विक्की जैनबरोबर प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच अंकिताने आता बिग बॉस घरात जाण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, अंकिता आणि विक्कीनं बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी शॉपिंग सुरुवात केली आहे. आतापर्यंत २०० कपडे खरेदी केले असून शोमध्ये एक ड्रेस पुन्हा रिपीट होणार नाही याचा प्लॅन दोघांनी केला आहे. हेही वाचा – Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक दरम्यान, अंकिता लोखंडे व्यतिरिक्त ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिक बिग बॉसच्या १७व्या पर्वात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता येत्या काळातच समजेल यातील कोणते कलाकार यंदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील.