“कलश कुठे आहे?” अंकिता लोखंडेचा गुढीपाडव्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप अनावर, म्हणाले “घरात कोणी…”

गुढीपाडव्याचा व्हिडीओ शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल

ankita lokhande troll
अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अंकिता लोखंडे लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. विकी जैनशी लग्न झाल्यानंतरही अंकिता पांरपरिक पद्धतीने सगळे जण साजरे करताना दिसते. मराठी नववर्षातील पहिला गुढीपाडवा सण अंकिताने मोठ्या उत्साहाने साजरा केला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

गुढीपाडव्यासाठी अंकिताने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर विकीने डिझायनर कुर्ता परिधान केला होता. अंकिताने पारंपरिक पद्धतीने गुढी उभारुन पती विकीसह गुढीपाडवा साजरा केला. याचा व्हिडीओ शेअर करत अंकिताने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या फोटोमध्ये अंकिताने गुढीवर कलश ठेवलेला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंनी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोमधील अक्षयाच्या साधेपणाने वेधलं लक्ष

हेही वाचा>> “१०-२० वर्ष ब्रेक घे” नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले “रिमेक…”

अंकिताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. “कलश कुठे आहे?” असं एकाने कमेंट करत विचारलं आहे. तर दुसऱ्याने “गुढीवर कलश नाहीये” अशी कमेंट केली आहे. “कलश तर नाहीच…आणि घरात कोणी गुढी उभं करतं का? काहीही पद्धती यांच्या”, असंही एकाने म्हटलं आहे. “गुढीला कलश असतो…एवढं पण माहीत नसेल, तर कसली मराठी तू?” अशीही कमेंट केली आहे. “गुढी बाहेर लावायची असते” असं म्हणत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे. २०२१ मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:05 IST
Next Story
गुढीपाडव्याच्या शुभेच्छांबरोबर गौतमी देशपांडेने चाहत्यांना दिला महत्वाचा संदेश; म्हणाली, “हे वर्ष अधिकाधिक…”
Exit mobile version