'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस'च्या घरात आहे. 'बिग बॉस'च्या १७ व्या पर्वात ती पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. या घरात अनेकदा ती तिच्या भूतकाळातील घटनांबद्दल बोलत असते. एकेकाळी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तब्बल ७ वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. 'बिग बॉस'च्या घरात अंकिताने पुन्हा एकदा सुशांतच्या निधनाबद्दल भाष्य केलं आहे. अंकिता मुनव्वरला म्हणते की ब्रेकअपबद्दलची त्याची शायरी तिला जुन्या आठवणी आठवून देते. ती म्हणते, या सगळ्या गोष्टी बोलत जाऊ नकोस, त्याचा खूप परिणाम होतो. पण तुझी शायरी चांगली होती, मला खूप आवडली. नंतर ती सुशांतच्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे' हे गाणं म्हणू लागते. अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…” सुशांतला आठवून अंकिता मुनव्वरला म्हणाली, "तो खूप चांगला माणूस होता. होता असं म्हटलं की मला खूप विचित्र वाटतं. आता ठीक आहे, आता गोष्टी सामान्य झाल्या आहेत. सुशांत विकीचाही मित्र होता, पण तो आता या जगात नाही, त्यामुळे ही खूप वाईट भावना आहे." दोघेही गप्पा मारत असताना मुनव्वर अंकिताला सुशांतच्या मृत्यूबद्दल विचारतो. https://www.instagram.com/p/Cz217YhybO_/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== अंकिता म्हणाली, "मला याविषयी आत्ताच काही बोलायचं नाही. खरं तर असं नाही की मला हे तुला सांगायचं नाही पण.." त्यावर मुनव्वर म्हणाला, "सुशांतच्या मृत्यूबद्दल लोकांनी आपापले वेगवेगळे व्हर्जन सांगितले आहेत. पण तू त्या लोकांपैकी आहेस जिला सत्य माहित आहे." त्यानंतर अंकिताने खुलासा केला की, ती सुशांतच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती. "मी त्याच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकलेच नाही. मला वाटलं की मी हे पाहू शकत नाही. विकी म्हणाला होता की तू जाऊन ये. मी नाही म्हणाले. मी कसं पाहू शकले असते? असा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. मुन्ना मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना असं पाहिलं. एखाद्याला गमावणे म्हणजे असते, काय ते तेव्हा पाहिले. या सगळ्या गोष्टी आठवून वाईट वाटतं," असं ती म्हणाली.