Ankita Lokhande Viral Dance : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हे छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत असलेलं नाव आहे. पवित्र रिश्ता मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या या अभिनेत्रीकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. गणपती कलाकेंद्रातून गणरायाला घरी आणण्यापासून अंकिताच्या बाप्पाचे अनेक व्हिडीओज फॅनपेजेस आणि पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या सगळ्या व्हिडीओबरोबर अंकिताच्या घरातील गणपतीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात अभिनेत्री घरातच गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

अंकिता लोखंडेच्या घरच्या गणपतीला छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात निया शर्मा, कश्मीरा शाह, अर्जुन बिजलानी, मनिष पॉल या कलाकारांचा समावेश होता. अंकिताच्या घरी या सर्व कलाकारांनी बाप्पाची आरती केली. तर अनेक जण विविध गाण्यांच्या तालावर थिरकले. यात निया शर्मा आणि अंकिता लोखंडे आघाडीवर होत्या. या दोघींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा…“तुमची निष्ठा, तुमचा दृष्टिकोन…”, अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

अंकिताच्या घरात ‘अग्निपथ’ या सिनेमातील देवा ‘श्री गणेशा’ या गाण्यावर ढोल आणि ताशांचं संगीत वाजताना दिसत आहे, ज्यात अंकिता आणि निया नाचत आहेत. सुरुवातीला दोघीही संपूर्ण उर्जेसह नाचत आहेत. जसजसं संगीताचा वेग वाढतो, तसंच त्या दोघीही नृत्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स करत आहेत. सर्वात शेवटी त्या अगदी वेगाने फुगडी खेळताना दिसत आहेत. अंकिताचे फॅन्स आणि फॅन पेजेस हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

हेही वाचा…Video: तुळजा झाली जगतापाची सून, गृहप्रवेश करत असताना डॅडींनी घेतला टोकाचा निर्णय, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो

अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं असून, याच पार्श्वभूमीवर अंकिताला एक आनंदाची बातमी मिळाल्याचं बोललं जात आहे. अंकिताने सोशल मीडियावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि तिचा पती विकी जैन यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. यात अंकिताने संजय लीला भन्साळी यांचं कौतुक करत आभार मानले आहेत. “तुमच्या अद्भुत कलेबद्दल माझ्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीयेत. कामाप्रती तुमचं समर्पण आणि दृष्टी माझ्यासाठी सतत प्रेरणादायी आहे. तुम्ही मला केलेल्या मार्गदर्शनासाठी मी तुमची सदैव ऋणी राहीन,” असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. यावरून अंकिता संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अंकिताने याआधी ‘मणिकर्णिका’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. या सिनेमांतील भूमिकांमुळे छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीचं बॉलीवूडमध्ये खूप कौतुक झालं होतं.