Ankita Walawalkar Aka Kokan Hearted Girl : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रचंड चर्चेत आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘बिग बॉस’चा ग्रँड फिनाले पार पडल्यावर सगळे स्पर्धक आपआपल्या घरी परतले होते. गावागावांत प्रत्येकाचं जंगी स्वागत झालं. मात्र, अंकिताने रॅलीसाठी नकार देऊन मुंबईतली सगळी कामं पूर्ण करून ही कोकण हार्टेड गर्ल आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी गावी परतली आहे.

अंकिता वालावलकरने ( Ankita Walawalkar ) घरी परतल्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिच्या बरोबर तिचा होणारा नवरा कुणाल देखील होता. सिंधुदुर्गात जाताना वाटेत अंकिता सोशल मीडिया स्टार आणि तिचा जवळचा मित्र मंदार शेट्येला भेटली. अंकिताला जास्तीत जास्त व्होट मिळावेत यासाठी मंदारने बाहेरून तिला खूप पाठिंबा दिला होता. त्यामुळे कोकण हार्टेड गर्लने भेटून त्याचे आभार मानले.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Ankita Walawalkar and Dhananjay Powar
होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..

हेही वाचा : जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘गुलिगत’च्या गावी! सूरज चव्हाणची घेतली भेट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “बहिणीचा दर्जा दिला…”

अंकिता कोकणात परतली

अंकिता मालवणात पोहोचल्यावर तिच्या स्वत:च्या दुकानात गेली. याठिकाणी तिने सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत की नाही याची खात्री केली. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने काही मालवणी पदार्थ टेस्ट केले आणि हे दोघं जोडीने अंकिताच्या राहत्या घराच्या दिशेने रवाना झाले. लाडक्या लेकीला एवढ्या दिवसांनी घरी परतलेलं पाहून तिचे आई-बाबा प्रचंड आनंदी झाले होते. अंकिता तिच्या वडिलांना बिग बॉसच्या घरात भेटली होती. मात्र, आईपासून ती गेले कित्येक महिने लांब होती. त्यामुळेच पाहताच क्षणी अंकिताने आईला घट्ट मिठी मारली.

अंकिताच्या ( Ankita Walawalkar ) आईने औक्षण करून लेकीला घरात घेतलं. यावेळी मायलेकींचे डोळे पाणावले होते. औक्षण झाल्यावर दोघेही एकत्र “आता Bigg Boss नको आता झालं” असं म्हणाल्या. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : तांबडी चामडी चमकते उन्हात…; जिनिलीया अन् रितेश देशमुखचा मित्रमंडळींसह जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

अंकिताच्या ( Ankita Walawalkar ) व्हिडीओवर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अंकिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह अंकिता लवकरच लग्न करणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याच्याबरोबर फोटो शेअर करत या ‘कोकण हार्टेड गर्ल’ने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

Story img Loader