Premium

Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अभिनेता अंशुमन विचारेचा बायकोबरोबरचा ‘हा’ डान्स व्हिडीओ व्हायरल

Anshuman Vichare
अंशुमन विचारेचा बायकोबरोबरचा 'हा' डान्स व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतात. असाच एक अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. अंशुमन इतर कलाकारांप्रमाणे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतोच, पण प्रत्येक घडामोडींवर परखड मत देखील व्यक्त करत असतो. सध्या अंशुमनचा बायकोबरोबरचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: लंडनच्या रस्त्यावर गौरव मोरेचा भन्नाट डान्स, DDLJ मधील शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन

अंशुमनची पत्नी पल्लवी विचारने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अंशुमन आणि पल्लवी दादा कोंडकेंच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहीलं आहे की, “कोकणात गावी… तुरळ संगमेश्वर..केली एकच धम्माल..”

अंशुमनचा बायकोबरोबरचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. “१ नंबर जोडी”, “एकदम साधं, सरळ व साजेसे असं दादांच्या गाण्याला केलेलं नृत्य फारच सुंदर चालीत आलंय…. आम्ही दादाप्रेमी”, “तुमची काशी खूपच सुंदर आहे”, “एक नंबर डान्स”, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा – एका शब्दामुळे गौरव मोरेला अडवलं होतं विमानतळावर; पार्थ भालेरावने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, अंशुमनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘फूबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचला. त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच अंशुमन उत्तम गायक देखील आहे. ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात तो झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anshuman vichare dance with wife on dada kondke song pps

First published on: 07-10-2023 at 14:43 IST
Next Story
अंकिता लोखंडे असणार ‘बिग बॉस १७’ची सर्वात महागडी स्पर्धक? एका आठवड्यासाठी घेणाऱ्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क