‘शार्क टँक इंडिया’चं पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. पण या सगळ्यात अनेकदा शार्क्सचं बोलणंही चर्चेत असतं.

‘शार्क टँक इंडिया’च्या जजेसमध्ये बऱ्याचदा वादावादी होते. त्यात अनेकदा ते एकमेकांना टोमणे मारताना दिसतात. आता अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांच्यात शाब्दिक चकमक रंगली. यावेळी अनुपमने चक्क नमिताला अप्रत्यक्षरित्या माकड म्हटले.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Mumbai local Women Passengers Hardly Wears Clothes Like Shirt Suits
“मुंबई लोकलमध्ये किती बायका असे कपडे घालून चढतात, उगाच..”, ‘लंडन की लाली’ने उघडले डोळे, पाहा Video

आणखी वाचा : Shark Tank India 2: “शार्क्सना गुंतवणूक करायची नसेल तर…” राहुल दुआच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे कार्यक्रम ट्रोल

‘शार्क टँक इंडिया’च्या नव्या सीझनच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आईस क्यूब विकणाऱ्या एका कंपनीशी डील करताना नमिता आणि अनुपम यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांच्या झालेल्या सांभाषणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आईस क्यूब विकणाऱ्या कंपनीच्या उद्योजकांनी जजेसना दिलेल्या प्रेझेंटेशनने सर्व जज प्रभावीत झाले होते. अशातच त्यांनी जजना त्यांनी निर्मिती केलेला आईस क्यूब दाखवला. तो बघताच नमिताच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले कारण त्या बर्फाचा आकार मोठा होता.

हेही वाचा : “…तर त्यांनी शो सोडावा,” ‘मास्टरशेफ इंडिया’वर प्रेक्षक नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

तिने विचारलं, “हा इतका मोठा बर्फ तुम्ही वापरता ?” त्यावर “कॉकटेल्स, मॉकटेल्समध्ये अशाप्रकारचे आईस क्यूब वापरले जातात,” असं पियुषने सांगितलं. हे सगळं अनुपमनं ऐकल्यानंतर त्यानं नमिताला प्रत्युत्तर केलं. तो म्हणाला, “बंदर क्या जाने अद्रक का स्वाद? तू कॉकटेल्स, मॉकटेल्स पित नाहीस ना.” हे ऐकल्यानंतर मात्र नमिताला राग आला. परंतु तिने शब्द वाढवला नाही. ‘शार्क टँक इंडिया २’चा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावर कानेत करत कोणी हसलं तर कोणी अनुपमच्या या बोलण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.