scorecardresearch

‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क

रुपाली गांगुली गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुपम मालिकेने त्यांना नवी ओळख मिळाली

anupam actress
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये रुपाली गांगुली यांनी अनुपमा शहा हे प्रमुख पात्र साकारले आहे. मध्यंतरी त्या काही काळ मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या होत्या. या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. नुकतीच त्यांनी एक आलिशान गाडी विकत घेतली आहे.

रुपाली गांगुली या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांनी आपल्या नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पती अश्विन वर्मा आणि त्यांचा मुलगा रुद्रांश वर्मा कार शोरूममध्ये दिसत आहेत. घेतल्यानंतर त्यांनी केक कापून तिचे स्वागत केले आहे. मर्सिडीज-बेंझ GLE या श्रेणीतील गाडी खरेदी केली असून ज्याची किंमत जवळपास ९० लाख इतकी आहे.

लग्नानंतर १० वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री गरोदर; खंत व्यक्त करत म्हणाली, “नातेवाईकांनी मला खूप…”

रुपाली गांगुली यांनी व्हिडीओला कॅप्शन दिला आहे की, “कृतज्ञता, मला स्वप्न पाहण्याची हिंमत दिल्याबद्दल धन्यवाद. मला माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद रुद्रांश वर्मा मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद ज्यांच्यामुळे स्वप्न सत्यात उतरले जय मातादी जय महाकाल,” अशा शब्दात त्यांनी आपलूं भावना व्यक्त केल्या आहेत.

रुपाली या छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहेत. रुपाली यांचे लाखो चाहते आहेत. मालिकेत रुपाली अशा महिलेची भूमिका साकारत आहे जी तिच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते, कारण तिला एक चांगली आई आणि पत्नी बनायचे असते. याआधी त्यांनी ‘साराभाई Vs साराभाई’, ‘संजीवनी’, ‘बा बहू और बेबी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 17:54 IST
ताज्या बातम्या